संस्‍कारक्षम पिढी घडवण्‍यासाठी संतविचार आवश्‍यक :-पुरुषोत्तम म.हिंगणकर… — समता विद्यालयात ओळख ज्ञानेश्वरीची अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

भोसरी : संस्‍कारक्षम पिढी घडवण्‍यासाठी संतविचार आवश्‍यक असून त्‍याचे संस्‍कार प्राथमिक शिक्षणापासून देण्‍याच्‍या उद्देशाने ‘श्री ज्ञानेश्‍वरी’ आणि ‘हरिपाठ’ यांचा शालेय शिक्षणात प्रथमच स्‍वतंत्र अभ्‍यासक्रम सिद्ध करण्‍यात येत आहे. विद्यार्थ्‍यांना एक आदर्श व्‍यक्‍ती घडवण्‍याच्‍या उद्देशाने ‘ओळख श्री ज्ञानेश्‍वरी’ची या संस्‍कारक्षम उपक्रमाच्‍या माध्‍यमातून ज्ञानेश्‍वरीचे विचार शाळेतील मुलांना दिले जात आहे असे गौरवोद्गार अ.भा.वैष्णव साहित्य कला मंचाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज हिंगणकर काढले आहे.

       ओळख श्री ज्ञानेश्र्वरीची या शालेय मुलांसाठी सुरू असलेल्या संस्कारक्षम उपक्रमाचे विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ समता प्राथमिक विद्यालयात हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रकाश काळे, सुभाष महाराज गेठे, विलास वाघमारे, विश्वंभर पाटील, धनाजी काळे, संस्थेचे संचालक श्रीधर घुंडरे, समता विद्यालय सचिव श्रीकांत बापू फुगे, संचालिका अनघा फुगे, मुख्याध्यापिका शुभांगी घुंडरे, नारायण कवडे, मीनाक्षी साबळे, मल्लिकार्जुन एकलारे, यास्मिन शेख अर्चना चंदेवाड आदी उपस्थित होते.

        या उपक्रमात समता प्राथमिक विद्यालय भोसरी येथे महाराष्ट्रासह बिहार, मध्यप्रदेश, पंजाब आणि उत्तरप्रदेश मधील शालेय मुले शिक्षण घेत आहेत. ५ राज्यातील मुले या शाळेत शिक्षण घेत असल्याने खऱ्या अर्थाने येथे समता प्रस्तापित झाली आहे. या विद्यालयाचे माध्यमातून ओळख ज्ञानेश्वरीची, हरिपाठ पाठांतर या उपक्रमात सहभागी झालेल्या परराज्यातील मुलांचे सहभागाने उपक्रम महाराष्ट्रा बाहेरील शालेय मुलांपर्यंत पोहोचला आहे असे मत सुभाष महाराज गेठे यांनी व्यक्त केली.

        ओळख ज्ञानेश्वरीची अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी यामध्ये साक्षी आनंदा डुमणे (प्रथम), वैष्णवी सुनील वरणकार (द्वितीय), अश्वरा समाधान ईसाई (तृतीय), गौरव देवानंद गाडे (चतुर्थ), मानसी प्रदीप मिश्रा (पाचवा), आदिती राजू राठोड (सहावा), श्रावणी सुनील बहिरे (सातवा), अर्पिता आनंद मौर्या (आठवा) या गुणवंत मुलांचा समावेश आहे. उपस्थित मान्यवरांचे हस्ते यावेळी पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आले. परीक्षक अध्यापक म्हंणून पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक श्रीधर घुंडरे यांनी केले.