कविता मनाला झोंबली पाहिजे तरच कळेल – कवी लखनसिंग कटरे..

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा..

लाखनी:-समर्थ महाविद्यालय,लाखनी येथे मराठी विभागातर्फे आज दि २९ एप्रिल २०२४ रोज सोमवारला भेट कवींशी या उपक्रमांतर्गत कवी लखनसिंग कटरे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिगांबर कापसे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून साहित्य अकादमी सदस्य आणि कवी लखनसिंग कटरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

         प्रमुख अतिथी म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ.बंडू चौधरी व प्रा.अजिंक्य भांडारकर उपस्थित होते.

        कार्यक्रम आभासी स्वरुपात घेण्यात आले असून बी. कॉम प्रथम वर्ष मराठी अभ्यासक्रमाला कवी लखनसिंग कटरे यांची जागर कविता अभ्यासण्यासाठी असून प्रत्यक्ष कवीकडून विद्यार्थ्यांना कविता अभ्यासनाचा आनंद मिळाला.

        या प्रसंगी विद्यार्थ्यांनी कवी लखनसिंग कटरे यांच्या सोबत प्रश्न उत्तरांद्वारे संवाद साधला.या वेळी कवी लखनसिंग कटरे यांनी जागर कवितेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

        कवितेविषयी असलेली प्रेरणा आणि कवितेतून जगण्याविषयी मिळणारा आनंद या बाबद त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून महत्व विशद केले.

        या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिगांबर कापसे यांनी अभ्यासक्रमात अभ्यास करण्यासाठी येणारे कविता अभ्यासण्यासाठी कवी आणि लेखक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना भेटतात,तेव्हा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिकच भर पडत असून असे भेट कवींशी या उपक्रमात महविद्यालय नेहमी प्रयत्न करीत असते.

         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.बंडू चौधरी यांनी केले व संचलन प्रा.अजिंक्य भांडारकर यांनी केले तर आभार तेजराम चांदेवार यांनी मानले.