नदी पात्रातील डोहात पाय घसरुन 19 वर्षीय युवकाचा मृत्यू..

युवराज डोंगरे/खल्लार

        उपसंपादक

     नदी पात्रातील डोहात पाय घसरुन खल्लार नजिकच्या चिपर्डा येथील 19 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना काल दि 28 एप्रिल ला घडली.

       यश अनिल येवले(19) रा. चिपर्डा असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव असुन काल 28 एप्रिल रोजी यश हा त्याच्या मित्रासोबत रोडगे जेवण्यासाठी दोनद येथील आसरा माता देवीजवळ( ता बार्शीटाकळी जि अकोला) गेला होता. 

       मित्रासमवेत यश नदीवर गेला असता त्याचा नदी पात्रातील डोहात पाय घसरून तो पाण्यात बुडाला.त्याला बाहेर काढून उपचारार्थ अकोला येथे नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

       यश हा त्याच्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पार्थिवावर काल (28)एप्रिलला रात्री उशिरा चिपर्डा येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

        यश याच्या दुःखद निधनामुळे गावात सर्वत्र शोक व्यक्त केल्या जात आहे.