प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोलीच्या वतीने,लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या स्मृती दिना निमित्ताने पत्रकारांचा सत्कार..

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक

 साकोली -प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने आज विश्राम गृह साकोली येथे लोकशाहीर महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृती दिवस साजरा करण्यात आला.

     त्यानिमित्ताने साकोली तहसील मधील लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार बंधू यांचा स्मृती चिन्ह, प्रमानपत्र , पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

          दिनांक 23,24 फेब्रुवारी 2024 ला जिल्हास्तरीय लोककला महोत्सव लवारी येथे आयोजित करण्यात आले होते. त्या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार आयोजित करण्यात आले होते.

        परंतु काही पत्रकार बंधु तिथे उपस्थित न झाल्याने आज महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

        सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अशोक गुप्ता, प्रमुख अतिथी म्हणून डी .जी .रंगारी,जेष्ठ नाट्य अभिनेत्री तथा माजी जिल्हा परिषद सदस्या भूमाला ताई उईके उपस्थित होते.

       या सत्कार प्रसंगी अशोक गुप्ता,शाहिद कुरैशी,ताराचंद कापगते,सुनील जगिया,ऋग्वेद येवले,रवि भोंगाने,आशिष चेडगे, राजेश बैस,संतोष कोरे,डी.जी. रंगारी,मनीषा काशिवार,सुदाम हटवार,प्रशांत शिवणकर यांचा सत्कार करण्यात आला.

        सोबतच जेष्ठ नाट्य अभिनेत्री भूमालाताई उईके,नाट्य कलावन्त विनोद मुरकुटे,मनोज बोपचे,रोहित मांढरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

       ज्ञया कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, प्रबोधनकार मनोजभाऊ कोटांगले, तालुका अध्यक्ष मनोज बोपचे, उपाध्यक्ष संजय टेंभुर्ने,संचालक धनंजय धकाते, उमेश भोयर,विनोद मुरकुटे, रोहित मांढरे यांनी केले.

          कार्यक्रमाचे संचालन भावेश कोटांगले आभार मनोज कोटांगले यांनी मानले.