राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दलाचा नक्षल विरोधी अभियानात कार्यरत सि.६० पथकात कार्यरत पोलीस शिपाई प्रशांत बारसागडे याला नक्षल विरोधी अभियानातील विशेष कामगीरी करीता केंद्रीय गृहमंत्रालयाचा वतीने नूकतेच मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) चा कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात “केंद्रीय गृहमंत्री विशिष्ट आपरेशन पदक” प्रदान करीत गौरव करण्यात आला.
पोलीस शिपाई प्रशांत बारसागडे हा मूळचा कूरखेडा जि.गडचिरोली येथील निवासी असून सन २०१२ मध्ये तो जिल्हा पोलीस दलात दाखल झाला तेव्हापासूनच त्याची नेमणूक नक्षल विरोधी अभियाना करीता निर्मित सि.६० या विशेष पथकात करण्यात आली आहे. जिल्हा मूख्यालयातून नक्षल विरोधी अभियानाचे नियोजन कामात मागील काही वर्षात बारसागडे याने विशेष कामगीरी बजावलेली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यानी देशातून नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत हद्दपार करण्याची घोषणा केली होती या घोषणेला जिल्हातूनही मोठा प्रतिसाद मिळाला जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचा नेतृत्वात पोलीसांनी जिल्हातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आणला आहे.
या यशात सि.६० पथकाची सूद्धा मोठी भूमिका आहे व याच दलात कार्यरत प्रशांत बारसागडे यांचा कार्याची दखल घेत मुंबई येथे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख नवल बजाज यांचा हस्ते केंद्रीय गृहमंत्री यांची स्वाक्षरी असलेले प्रशस्तीपत्र पत्र व केंद्रीय गृहमंत्री विशिष्ट आपरेशन पदक प्रदान करीत त्याना सन्मानित करण्यात आले.



