Home Maharashtra श्री.बाळकृष्ण बिजा जांभुळे यांच्या विहिरीचे बांधकाम सुरु न करताच काढले मजूरांच्या मजूरीचे...

श्री.बाळकृष्ण बिजा जांभुळे यांच्या विहिरीचे बांधकाम सुरु न करताच काढले मजूरांच्या मजूरीचे रुपये!,”संगनमताने केली रुपयांची अफरातफर…. — चिमूर पंचायत समिती मनरेगा विभागाचे साहाय्यक कार्यक्रम अधिकारी अजय वाकडेंचा प्रताप! — विहीर धारकांच्या पत्नीकडूनही मजूरीच्या नावावर घेतेले ३० हजार रुपये!

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

         चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुकातंर्गत येत असलेल्या मौजा वाघेडा येथील श्री.बाळकृष्ण बिजा जांभुळे यांच्या विहिरीचे बांधकाम सुरु करण्याअगोदरच,विहिरीचे बांधकाम सुरु झाल्याचे दाखवून मजूरांच्या मजूरीचे अनेक मस्टर निकाली काढून रुपयांची उचल,”मनरेगा विभागाचे साहाय्यक कार्यक्रम अधिकारी अजय वाकडे यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

     एकीकडे विहिरीचे बांधकाम सुरु करतो म्हणून विहीरधारक श्री.बाळकृष्ण बिजा जांभुळे यांच्या पत्नी सौ.सुमीत्रा बाळकृष्ण जांभुळे यांच्याकडून मजूरांच्या मजूरीचे रुपये देण्याचा बाहाना करुन,याच साहाय्यक कार्यक्रम अधिकारी अजय वाकडे यांनी ३० हजार रुपये उकळले.एवढ्यावरच ते थांबले नाहितर सौ.सुमीत्रा बाळकृष्ण जांभुळे यांच्या कायदेशीर व प्रशासकिय अज्ञानाचा फायदा उचलत त्यांनी परत रुपये मागितले असल्याचे सौ.सुमीत्रा बाळकृष्ण जांभुळे यांचे म्हणणे आहे.

                याचबरोबर दिनांक २० एप्रिल २०२६ रोज सोमवारच्या रात्रोला मौजा वाघेडा येथे श्री.बाळकृष्ण बिजा जांभुळे यांच्या घरी साहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री.अजय वाकडे गेले व स्वत:ला वाचविण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी सौ.सुमीत्रा बाळकृष्ण जांभुळे यांच्याकडून त्यांनी लिहलेल्या कागदावर सही/अंगठा मारुन घेतले.मात्र त्या लेखी पत्रात काय नमूद आहे हे सौ.सुमीत्रा बाळकृष्ण जांभुळे यांना सांगितले नाही.

     चिमूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मनरेगा विभागाचे साहाय्यक कार्यक्रम अधिकारी अजय वाकडे यांनी विहिरधारकांच्या पत्नीकडून ३० हजार लालसेपोटी उखळने हा फसवणूकीचा गुन्हा असल्याने,सदर अधिकाऱ्यांची वेळ न दवडता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे असे चिमूर तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे.

    तद्वतच श्री.बाळकृष्ण बिजा जांभुळे यांच्या विहिरीचे बांधकाम सुरु न करता मजूरांच्या मजूरीचे मस्टर निकाली काढून साहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री.अजय वाकडे यांनी संगनमताने रुपयांची उचल केली असल्याने त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

        यामुळे साहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री.अजय वाकडे यांची कसून चौकशी झाली पाहिजे व श्री.बाळकृष्ण बिजा जांभुळे यांच्या विहिरीचे बांधकाम सुरु झाले असे दाखवून खोटे रेकार्ड तयार केले व आर्थिक गैरव्यवहार केला असल्याच्या सबबीखाली त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली पाहिजे,असा जनप्रवाह आहे.