उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक…
पुणे :- चंदननगर भागात बौद्ध महिला पुनम मून (वय 35 वर्ष) ही नराधम एडवोकेट संजय सावंत यांच्या ऑफिसमध्ये तीन वर्षांपासून कामाला होत्या.
१६ एप्रिल २०२६ रोजी ऑफिसमध्ये सावंत,त्यांची पत्नी व मुलगी यांनी क्रूर हल्ला करून पुनम मून यांना संपवले असल्याचा आरोप आॅल इंडिया पॅथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की,मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह पोत्यात भरण्याचा प्रयत्न केला.पीडितेच्या नवऱ्याची दिशाभूल करण्यासाठी,घरी न आलेल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी तो फिरत असताना,त्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून त्याची दिशाभूल केली गेली.
हल्ला एवढा गंभीर आहे की पीडितेचा चेहरा ओळखू येत नाही.जवळपास 50 ते 56 वार चेहऱ्यावर करण्यात आलेले आहेत.बॅट,कोयता,लोखंडी रॉड,दांडे यांचा वापर करण्यात आलेला आहे.दोन्ही हात मोडण्यात आलेले आहेत.त्यामुळे हे हत्याकांड अतिशय गंभीर असून,तिला कटकारस्थान करून मारण्यात आले असल्याचे आॅल इंडिया पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी स्पष्ट केले.
पुनम मून हत्या प्रकरणाची अतिशय गंभीर घटना असून,या घटनेची यंत्रणेमार्फत चौकशी झाली पाहिजे.आरोपींना फाशीची शिक्षा फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ झाली पाहिजे.पीडित परिवाराला पोलीस संरक्षण मिळाले पाहिजे,पतीला शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत दिली पाहिजे.पुनम मून यांना दोन मुले आहेत,त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे अशी भूमिका दिपक केदार यांनी घेतली आहे.
14 एप्रिल अतिशय आनंदात साजरी करून ती 16 तारखेला ऑफिसला गेली होती.आरोपी हा वकील असून तो दोन नंबरचे प्रकरण करायचा,अशी माहिती कुटुंबाकडून मिळालेली आहे.त्या अनुषंगाने,या आरोपीचे काही मोठी उलाढाल तिला माहिती पडली होती का?,किंवा तिला सामूहिक रित्या पाच-सहा लोकांनी संपवले आहे का?,अशा पद्धतीचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.
त्यामुळे 15 आणि 16 तारखेला कार्यालयाच्या आजूबाजूचे मोबाईल लोकेशन,व्हिडिओ यांचा आधुनिक पद्धतीने तपास झाला पाहिजे.कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडता कामा नये.संजय सावंत हा नावाजलेला वकील असल्यामुळे आणि पीडित हे गरीब कुटुंब असल्यामुळे प्रकरण दडपण्याची शक्यता दाट आहे अशी शंका सुध्दा दिपक केदार यांना आहे.
आरोपी हा भाजपाचा कार्यकर्ता असून भाजपाच्या विधी शाखेचा अध्यक्ष आहे.एकीकडे नारीशक्ती विधेयक नामंजूर झालं म्हणून देशभर भाजपाचे महिला कार्यकर्ते रडत आहेत.
माजी खासदार नवनीत राणा,आमदार चित्रा वाघ,माजी विधानपरिषद सभापती नीलम गोरे,तुम्हाला दलित पुनम मून यांच्या बद्दल रडू का येत नाही?हा प्रश्न दिपक केदार यांनी केला आहे.
तिला मारणारा भाजपा पदाधिकाऱ्यांच्या पदाधिकारी आहे.भाजपा पदाधिकारी दलितांच्या महिलेला मारतात आणि दुसरीकडे भाजपा नारीशक्तीच्या गप्पा मारतो हा अत्यंत गंभीर प्रकार आहे.
आरोपी भाजपाचा असल्यामुळे व सरकार भाजपाचे असल्यामुळे,प्रकरण दडपण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.ऑल इंडिया पँथर सेना राज्यभर आंदोलन छेडणार आहे असे दिपक केदार म्हणाले.
त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली.मृतक पुनम मून यांचे लहान लेकरं असून छोटीशी मुलगी चौथीत आहे,आणि एक मुलगा नववीत आहे.त्यांच्या शिक्षणासाठी ती काही किलोमीटर जाऊन काम करायची.राज्य सरकारने 25 लाखांची मदत, शकुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी रेटून धरण्यात आली आहे!
यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे,महाराष्ट्राचे सरचिटणीस जितेश भाई जगताप,विदर्भाचे युवा अध्यक्ष संकेत जाधव,तसेच पुण्याच्या शहराध्यक्ष मनीषाताई कदम उपस्थित होते.


