Home देशविदेश अरे माणसा! काय केलेस तू ?..

अरे माणसा! काय केलेस तू ?..

अरे माणसा ,काय केलेस तू ?

अन काय झालास तू ? — ध्रु 

नव्हती इथे जाती व्यवस्था

नव्हती इथे धर्म व्यवस्था

नव्हती इथे वर्ग व्यवस्था

नव्हती इथे मातृसत्ताक

की पितृसत्ताक व्यवस्था

नव्हती कोणती संस्कृती

होती इथे समता मानवता –१

केवळ तुझ्या हव्यासापायी

केले तू शोषण

निसर्गाचे अन माणसाचे

भोगले जीवन वैभवाचे

ऐश्वर्याचे,ऐशोरामचे

करुनी राज ( सत्ता ) 

अन्याय,अत्याचार,बलात्कार

सर्व सामान्य गोरगरिबांचे –३

निर्मिले तू 

जाती प्रवर्ग हे सामाजिक वर्ग

निर्मिले तू 

भिकारी,दरिद्री,गरीब,

मध्यम श्रीमंत गर्भश्रीमंत

जमीनदार राजवाडे 

कारखानदार उद्योगपती

देशी भांडवलदार आणि 

जागतिक भांडवलदार 

केले खरेदी

देशोदेशींचे सरकारे

वाढण्या आपला जागतिक व्यापार

विकण्या आपला देशी माल

होण्यासाठी मालामाल — 4

टिकवण्यासाठी सत्ता

वापरली जात आणि धर्म

अरे स्वार्थी दुष्ट माणसा 

तुझेच हे क्रूरकर्म आणि वर्म –५

निर्मिले आर्थिक वर्ग

आणि सामाजिक वर्ग

जाती आणि धर्म

लाविले भांडण त्यांच्यात

साधण्यासाठी आपले वर्म –६

निर्माण केलीस तू 

आर्थिक आणि सामाजिक 

सांस्कृतिक राजकीय विषमता

संपविली तू सर्व समता

घेतले डोक्यावरी

हे विषमतेचे पाप

तुडविले पायी 

हे समतेचे पुण्य .

सुरू केलेस तू

हे अशुद्ध अपवित्र वर्तन – 6

संपेल सहनशक्ती तेंव्हा

भिकारी,गरीब,वंचित,पीडित

अभावग्रस्त, बेकार तरुण 

अबाल वृद्ध प्रौढ स्त्रिया

सारेच पेटतील आणि

करतील क्रांती सगळे शोषित

समतेसाठी — 7

           कवी : सु. द. तु.

        सत्यशोधक समाज नांदेड.

                    9420912209.