हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामदैवत भैरवनाथाचे सहकुटुंब घेतले दर्शन!… — बावडा येथे भैरवनाथाची यात्रा सुरू…

   बाळासाहेब सुतार

 निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

               बावडा गावचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भैरवनाथ मंदिरात बुधवारी ( दि. 9) सकाळी सहकुटुंब विधिवत पूजा केली व दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी भैरवनाथाच्या अश्वाचे दर्शन घेतले व श्रीफळाचे तोरण अर्पण केले.

     यावेळी इंदापूर तालुका जिजाऊ बचत गट असोसिएशनचे अध्यक्षा सौं.भाग्यश्री पाटील, इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व युवा नेते राजवर्धन पाटील उपस्थित होते. चालू वर्षी चांगले पाऊसमान होऊन, नागरिक व शेतकरी सुखी समाधानी व्हावेत, असे श्री भैरवनाथ चरणी साकडे घातल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच यात्रेनिमित्त हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांना यावेळी शुभेच्छा दिल्या.

       भैरवनाथ यात्रेनिमित्त श्रींची छबिना मिरवणूक बुधवारी दि.15 रात्री निघणार असून, गुरुवारी दि.16 रात्री 7 वा. बाजारतळावरती मनोरंजनासाठी लोकनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती याप्रसंगी उदयसिंह पाटील यांनी दिली.