Home Maharashtra वर्षभरापासून काळीपिवळीचा दरारा…. — गडचिरोली-आरमोरी मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवासांना कोंबून आणत,केले...

वर्षभरापासून काळीपिवळीचा दरारा…. — गडचिरोली-आरमोरी मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवासांना कोंबून आणत,केले जाते डबल भाडे वसुली….

 लक्षवेधी 

ऋषी सहारे 

   संपादक 

गडचिरोली, : गडचिरोली ते आरमोरी रूटवर गेल्या वर्षभरापासून प्रवाशांची लूट सुरू आहे. ट्रॅव्हल्स आणि खासगी बसचालकांनी या रूटवरील प्रवासी घेणे बंद केल्याने काळीपिवळी टॅक्सी चालकांची मक्तेदारी निर्माण झाली आहे.

      ST बसचे भाडे ₹.60-70 असताना काळीपिवळी वाले ₹.100 पर्यंत वसुली करत आहेत.म्हणजे डबल भाडे!..

       यावरही प्रवाशांची अडवणूक होत आहे – 4 सीटर गाडीत 8-10 प्रवासी कोंबून भरले जात आहेत.यामुळे महिलांना,वृद्धांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

        प्रवाशांची मागणी आहे की RTO ने याची तातडीने दखल घेऊन सदर गाड्यांचा परवाना रद्द करावा आणि या रूटवर ST/ट्रॅव्हल्स सेवा सुरू करावी.”वर्षभर तक्रार करूनही कारवाई नाही” असा आरोप प्रवासी करत आहेत.यामुळे आतातरी कारवाई होणार का? याकडे प्रवाश्यांचे लक्ष लागले आहे.