प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील अनेक संघटनांनी,UGC बिल,EVM (ईव्हीएम) विरोधात आणि बॅलेट पेपरच्या (Ballot Paper) समर्थनासाठी व ओबीसींच्या राष्ट्रीय जनगणनेसह त्यांच्या प्रतिनिधीत्वासाठी,२३ एप्रिल २०२६ रोजी भारत बंदची हाक दिली आहे.
या आंदोलनातील,”लोकशाही वाचवणे,हा मुद्दा भारत देशातील सर्व मुल निवासी लोकांच्या अधिकारांसी व हक्कांसी निगडित आहे.
मुल निवासी लोक म्हणजे भारत देशातीलच रहिवासी असलेले लोक,”जे बाहेर देशांतून आलेले लोक नाही!,”याच लोकांच्या हितासाठी,संरक्षणासाठी,हक्कासाठी,प्रगतीसाठी,आणि ब्राम्हणांच्या छडयंत्रातून त्यांना बाहेर काढण्यासाठी,भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि त्यांचे पदाधिकारी,कार्यकर्ता,हे सातत्याने संघर्ष करताहेत.
मनुवादी-ब्राम्हणवादी,भांडवलशाही विचारधारेचे केंद्र सरकार व राज्य सरकारे,”लोकशाहीसाठी धोकादायक आहेत,”म्हणजे,भारत देशातील मुल निवासी लोकांसाठी कशी धोकादायक आहेत,हे पुराव्यासह भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम वारंवार समोर आणत आहेत.
यामुळे ते कार्यक्रमाच्या व आंदोलनाच्या माध्यमातून मनुवादाचा व ब्राम्हणवादाचा बुरखा टराटर पाडताना दिसतात.म्हणूनच २२ फेब्रुवारी २०२६ ला नागपूरत झालेल्या आंदोलनात जे स्लोगन पुढे आले ते वास्तविक परिस्थितीसी,घटनाघडामोडीसी निगडित होते,”असे त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यापैकी एक महत्त्वपूर्ण स्लोगन….
👇👇
“ब्राम्हणवाद ब्राम्हणवाद – जबसे बडा आंतकवाद,…
“ब्राम्हणवाद ब्राम्हणवाद – सबसे बडा नक्षलवाद,…
हा आहे.
२२ फेब्रुवारी २०२६ च्या आंदोलनातंर्गत वरील स्लोगने तर देशातील सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते…
“भारत देशातील लोकांच्या अधिकारांना आणि भारतीय लोकशाहीला,जो धोका भाजपा सत्ताधाऱ्यांनी निर्माण केला आहे तो ईव्हिएम मशीन द्वारे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळेच!,”ईव्हिएम मशीन द्वारे घोटाळे करून निवडून येण्याची कार्यपद्धत राष्ट्रीय काँग्रेस पक्षांसह भाजपाने सुरु केली असल्याचे पुरावेच भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी समोर आणले.
— “यामुळे ते वारंवार म्हणतात,”ईव्हिएम मशीन मत चोर आहे आणि या मत चोरींचा सरदार भारताचे निवडणूक आयोग आहे…..
म्हणूनच भारत देशातील,” मुल निवासी ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याक आणि इतर लोकांच्या हितासाठी,संरक्षणासाठी, हक्कासाठी,उन्नतीसाठी,शांतीसाठी,समानतेसाठी,न्यायासाठी,बंधुत्वासाठी,अभिव्यक्तीसाठी,”भारत देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका पारदर्शक,भिती मुक्त,निष्पक्ष झाल्या पाहिजेत असे बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे म्हणणे आहे.
याचबरोबर ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यांच्या जनसंख्या नुसार शासन-प्रशासनात त्यांना प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे असेही त्यांनी वारंवार सांगितले आहे.हा मुद्दा २३ एप्रिल २०२६ च्या आंदोलनात सहभागी आहे…..
(प्रतिनिधीत्व म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि शासकीय-प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी.)
तद्वतच मुल निवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातंर्गत समान हक्काचा मुद्दा UGC बिलान्वये कायदेबध्द झाला असल्याने हा मुद्दा सुध्दा आंदोलनात समाविष्ट आहे.
यांसारख्या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.यामुळे भारत बंद दरम्यान शाळा,महाविद्यालये,बँका आणि वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारत बंदची प्रमुख माहिती देताना वामन मेश्राम (भारत मुक्ती मोर्चा/बामसेफ).यांनी प्रमुख मागण्या स्पष्ट केल्यात.१) निवडणुकीत EVM हटवून बॅलेट पेपरचा वापर करावा,२) ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे,आणि NRC-CAA ला विरोध करणे.
देशव्यापी आंदोलनांतर्गत रेल्वे आणि रस्ते रोखण्याचा इशारा दिला आहे.या आंदोलनाला बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, आणि विविध किसान संघटनांचा पाठिंबा आहे.
ओडिशातील अधिवेशन रद्द झाल्याच्या निषेधार्थ,२२ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपुरातील आर.एस.एस. (RSS) मुख्यालयावर देशव्यापी मोर्चा काढण्यात आला होता.
भारत मुक्ती मोर्चा (BMM) ही बामसेफच्या (BAMCEF) वैचारिक भूमिकेतून स्थापन झालेली,वमन मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाजाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी एक प्रमुख लढाऊ संघटना आहे.
ही संघटना संविधानाचे संरक्षण,ओबीसी जनगणना,EVM विरोधात आंदोलन आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध आक्रमक निदर्शने करण्यासाठी ओळखली जात आहे.
भारत मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि नेतृत्व : वामन मेश्राम असून या संघटनेचा उद्देश बहुजन समाज (SC, ST, OBC आणि अल्पसंख्याक) यांना जागृत करणे,संविधानाचे रक्षण करणे आणि सामाजिक न्यायासाठी लढा देणे,ब्राम्हणवादासह मनुवादातून मुल निवासी बहुजन समाजातील लोकांना मुक्त करणे हा आहे.
रा. स्व. संघ मुख्यालयावर मोर्चे आणि केंद्र सरकारच्या कामगार/शेतकरी,मुल निवासी बहुजन समाज व शैक्षणिक विरोधी धोरणांना विरोध,संविधानाचे संरक्षण,लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी संघर्ष करणे हे काम भारत मुक्ती मोर्चाचे आहे.
या संघटनेच्या कार्यपद्धती धरणे आंदोलन करणे,जेलभरो आंदोलन करणे,आणि भव्य मोर्चे काढणे असे आहे.
भारत मुक्ती मोर्चाने आपल्या विविध मागण्यांसाठी,विशेषतः नागपूरमधील RSS मुख्यालयावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर अनेकदा आंदोलने केली आहेत.हे संघटन बामसेफच्या धोरणांना रस्त्यावर राबवण्याचे काम करते.
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष (BMM) वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील,बामसेफशी (BAMCEF) संलग्न असलेली बहुजनवादी संघटना आहे.ती प्रामुख्याने देशातील शोषित,मागासवर्गीय (SC/ST/OBC) आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी,तसेच संविधान रक्षणासाठी आणि रा.स्व. संघाच्या (RSS) विचारधारेला विरोध करण्यासाठी आंदोलने करते.
बामसेफ (BAMCEF) आणि भारत मुक्ती मोर्चा (BMM) या वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील अनुसूचित जाती,जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रमुख संघटना आहेत.बामसेफ कर्मचारी संघटना असून,भारत मुक्ती मोर्चा तिचे राजकीय व सामाजिक संघर्ष करणारे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे,जे प्रामुख्याने EVM विरोधी,संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी काम करतात.
बामसेफची ६ डिसेंबर १९७८ रोजी मान्यवर कांशीरामजींच्या दूरदृष्टीतून स्थापना झाली.बामसेफचा उद्देश बहुजन समाजातील (SC/ST/OBC/ अल्पसंख्याक) कर्मचारी/अधिकारी यांना संघटित करून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणे आहे.
ही संघटना थेट निवडणूक लढवत नाही,परंतु ‘बॅकफूट’वरून बहुजन समाजाला शिक्षित व संघटित करण्याचे काम करते.
भारत मुक्ती मोर्चा (Bharat Mukti Morcha) बामसेफच्या विचारातून रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी निर्माण झालेली लढाऊ संघटना आहे.
मुख्य मुद्दे…
१) EVM विरोध,२०१४ पासून EVM विरोधी देशव्यापी जनआंदोलन आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी.
२) संविधानाचे रक्षण.
३) आरएसएस-बीजेपीच्या धोरणांना विरोध आणि लोकशाही रक्षणासाठी लढा.
४) ८५% बहुजनांना आरक्षण व इतर घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष…
देशभरातील जिल्ह्यांमध्ये या संघटनांचे जाळे असल्याने आणि इतर संघटनांनी २३ एप्रिल २०२६ च्या भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दिल्याने,भारत मुक्ती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



