Home देशविदेश महापुरुषांच्या ( डॉ. आंबेडकर आणि म. फुले ) जयंत्या संपल्या……. —...

महापुरुषांच्या ( डॉ. आंबेडकर आणि म. फुले ) जयंत्या संपल्या……. — वर्गणी गोळा करून,डी.जे. च्या तालावर नाचून,बॅनरवर विविध पैलूचे बाबासाहेबांचे (AI ) फोटो टाकून,बेंबीच्या देठापासून बोंबलत… — जयंत्या साजऱ्या केल्या आणि महापुरुषांचे आम्ही 100% उपकार फेडले!

         वरील प्रकारच्या पद्धतीने आम्ही शुभ्र वस्त्र परिधान करून जयंती साजरी केली.फोटोला,पुतळ्याला हारही घातले,गोडधोड पोटभर जेवणही केले.सायंकाळी गाडी सजवून मिरवणूक काढून रात्री उशिरा झोपी गेलो. झाले आमचे कर्तव्य संपले.जणूकाही पुढच्या वर्षी लवकर या अशा भावनेने आम्ही स्वतःचेच समाधान करून घेतलो.असे आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी,लेकरं!

      असे गेल्या 70 वर्षापासून का घडत असेल? या मानसिकतेला मनुवाद्यांची RSS ची देण म्हणावी का?,का बुद्धीजीवी वर्गाचे अपयश म्हणावे का? की महापुरुषांना ओळखण्याची आमची कुवत नाही?,आम्ही एवढे कसे लाचार?

          कारण साडी,माडी आणि गाडीचा डोळ्यावर स्वार्थी पडदा आल्याने आम्हांला महापुरुषांचा त्याग,संघर्ष आणि समर्पणातील क्रांती कधीच दिसू शकली नाही. म्हणून हा असा प्रवाह निर्माण झाला.त्याला RSS ने खतपाणी घालून मोठे केले.त्यालाच आम्ही बळी पडलो.

       कधीतरी विचार केलाय का?,की आम्ही काय केले म्हणजे महापुरुषांचे थोडेतरी उपकार फेडल्याचे स्वतःला समाधान लाभेल.

          ज्या महापुरुषांनी संपूर्ण व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी, सत्य आणि विवेकाच्या मार्गांवर आणण्यासाठी, मानवी कल्याणासाठी विद्रोह आणि प्रसंगी बंडही केले.

        स्वतः दुःखाचे माउंट एव्हरेस्ट सहन करत पार केले.परंतू,त्यांनी कधी आपल्याला त्यांनी भोगलेल्या दुःखाची जाणीव सुद्धा न होऊ देता,आमच्या सुखासाठी जीवन समर्पित केले. 

         त्याच भरकटलेल्या व्यवस्थेला वठणीवर आणण्याऐवजी,त्याच व्यवस्थेला आज बाबा तुझीच लेकरं आम्ही बळी पडलो.केवळ आणि केवळ फुटकळ पुरस्कारासाठी,क्षणभंगूर मान सन्मानासाठी,पैश्याच्या लोभासाठी…

      एकीकडे जगावर तिसऱ्या अंतिम जागतिक अणूयुद्धाची टांगती तलवार,कधी अमेरिका – इराण- रशिया – चीन – किम ज्योन्ग यांच्या हातून निसटेल याचा नेम नाही…

    गॅस,इंधन यांच्या कृत्रिम टंचाईमुळे जागतिक महागाई गगनाला भिडलेली….

       दुसरीकडे आमचे विश्वगुरु आणि विश्वामित्र ( मोदी – शहा ),”एपस्टीन फाईलमुळे, देशाला अमेरिकेच्या दावणीला बांधून सार्वभौमत्व घालवून बसले. SIR च्या नावाखाली मतदारांची नावे वगळण्यात पटाईत असलेल्या मुख्य निवडणूक आयोगाची आता महाराष्ट्रावर कृपा होत आहे.

        2047 पर्यंत विरोधी पक्षमुक्त भारताच्या जनतेचा पक्ष कसा सत्तेत राहिल याच उद्देशासाठी RSS मग्न आहे.जेणेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित,”भारताचे संविधान,हटवीण्यासाठी डोळ्यात तेल घालून त्यांचे काम चालू आहे. 

        आजपर्यंत जेंव्हा जेंव्हा केंद्रात भाजपचे सरकार आले,तेंव्हा तेंव्हा पाकिस्तानची मुजोरी वाढलेली आहे.कंधार विमान अपहरण प्रकरण असो,ज्यासाठी तीन अतिरेकी आम्ही सोडले ( ज्यांनी पुन्हा संसदेवर हल्ला चढवला ). पुलवामा प्रकरण आम्ही स्वतःच घडवून आणले ( तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याच म्हनण्यानुसार ).तसेच आताचे पहलगाम प्रकरण ज्यामुळे सिंदूर ऑपरेशन आपण केले आणि सीजफायर मात्र ट्रम्पने घोषित करून आमचे सार्वभौमत्व हिरावून घेतले. 

         अमेरिका – इस्राएल V/S इराण यांच्या युद्धाच्या 28 फेब्रुवारीला सुरुवात होण्याअगोदर 25 फेब्रुवारीला आमचे विश्वगुरु इस्राएलच्या संसदेत जाऊन भाषण देतात.

        परंतू प्रत्यक्ष युद्ध सुरु झाल्यानंतर मात्र मूग गिळून बसतात.पहिल्या पाच वर्षात ( 2014 ते 2019 ) पायाला भिंगरी बांधून आमचे स्वयंघोषित विश्वगुरु स्वतःला नॉनबायलॉजिकल म्हणून घोषित करतात. दुसऱ्याचे कधीही ऐकून न घेता मन की बात जनतेवर लादतात.गेल्या दहा वर्षात कधीच प्रेस कॉन्फ्रेस न घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा यांच्याच नावावर आहे. ( कदाचित गिनीज बुकमध्ये नोंद व्हायला पाहिजे ).

        अशा प्रकारची जागतिक आणि देशात मानवताविरोधी परिस्थिती असताना आमचा जागतिक बुद्धीजीवी वर्ग केवळ बघ्याची भूमिका घेतो. आणि आम्ही बाबासाहेबाचे अनुयायी आणि लेकरं मात्र RSS / मोहन भागवत,/ भाजप / मोदी / शहा / फडणवीस जे EVM केंद्र आणि राज्य सरकारे आहेत,त्यांच्या मनुवादी जाळ्यात अलगद अडकून आपल्या महापुरुषांच्या जयंत्या अशा प्रकारे साजरी करण्यात स्वतःला धन्य समजून 100% उपकार फेडल्याचे समाधान मानून पुढच्या वर्षी लवकर या म्हणत पुढच्या 14 एप्रिलची चातकाप्रमाणे वाट पाहतो!

      आमची युवापिढी आणि अनुयायी अशी भरकटेल,अशी कल्पना सुद्धा महापुरुषांनी केली नसेल!

यावर एकच उपाय….

      सुशिक्षित युवापिढीने महापुरुषांची ग्रंथावली डायरेक्ट वाचून,समजून घेऊन स्वतः जागृत होणे आणि इतरांना जागृत करणे. 

     विशेषतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान वाचून,समजून घेऊन स्वतः जागृत होऊन इतरांना जागृत करणे. हाच एकमेव उपाय आहे.त्याचबरोबर जागतिक मानवी हक्काचा जाहीरनामा वाचून समजून घेऊन त्याचाही प्रचार प्रसार करणे,म्हणजे जागतिक अणूयुद्ध थांबवण्यासाठीचे ते प्रयत्न असतील….

आवाहनकर्ता आणि संविधान जागृतीचा कृतिशील लेखक…

     अनंत केरबाजी भवरे 

( संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद,7875452689 )