Home Social प्रा.सुनंदा पाटील यांचा साहित्य सन्मान! 

प्रा.सुनंदा पाटील यांचा साहित्य सन्मान! 

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

       ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार गझलनंदा उर्फ प्रा.सुनंदा पाटील यांचा दि.१८ एप्रिल २०१६ रोजी कोकण मराठी साहित्य परिषद दादरच्या वतीने आजवरच्या त्यांच्या साहित्यिक वाटचालीबद्दल सन्मानीत करण्यात आले.सन्मानपत्र,पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन हा सन्मान करण्यात आला.

         कोकण मराठी साहित्य परिषद दादर शाखा मुंबई आणि अखिल भारतीय महिला परिषद सेवा भारतीय यांच्या संयुक्त विद्यमाने ” वासंतिक संध्या साहित्य कला दर्शन आणि साहित्यिक सन्मान असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.

         या कार्यक्रमासाठी कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ,प्रमुख पाहुण्या गायिका आणि वनिता समाज दादरच्या विश्वस्त माधुरी गोडबोले,कार्यवाह प्रा.दीपा ठाणेकर,मुंबई जिल्हाध्यक्ष विद्या प्रभू,सेवा भारतीच्या अध्यक्ष डॉली अय्यम,विश्वस्त अपर्णा राणे,शशिकला पाटणकर उपस्थित होते. 

         कोमसाप दादरच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अंजना कार्णिक,कार्यवाह मनोज धुरी आणि सर्व सदस्थांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

          सन्मानार्थी,कलावंत,आणि रसिक प्रेक्षकांची व श्रोत्यांची भरगच्च उपस्थिती हीच या कार्यक्रमाची यशस्विता म्हणावी लागेल.सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.