Home Social एक उत्तम चित्रकार पुनम प्रज्योत वासाडे!.. — इटलीच्या चित्रकला स्पर्धेत तीने...

एक उत्तम चित्रकार पुनम प्रज्योत वासाडे!.. — इटलीच्या चित्रकला स्पर्धेत तीने बाजी मारुन वणीचे नाव रोशन केले! 

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

      पुनम प्रज्योत वासाडे असं त्यांचे नांव! मुळची ती विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील मुळ रहिवाशी!,बालपणापासूनच त्यांना चित्रकलेची अमाप आवड व गोडी!

     एखादे चित्र कुठे वर्तमानपत्र किंवा मासिकात दिसलं कि ती पांढराशुभ्र कागद व पेन्सिल घेवून बसायची! असं करता करता पुनम एक दिवस कोणाचेही हुबेहूब चित्र रेखाटू लागली!

     आज चित्रकलेत यवतमाळ जिल्ह्यात एक प्रख्यात चित्रकार म्हणून पुनम वासाडेचे नाव पुढे आले आहे.

     वणीतील अनेक कार्यक्रमस्थळी या रंगवेड्या पुनमने आपल्या कलेतून लक्षवेधक चित्रे साकारली होती.तीच्या कलेतून साकारलेल्या चित्रांना वणीकरांनी प्रथम पसंतीची पावतीही दिली आहे.

      वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात बिए प्रथम वर्षाला शिक्षण घेत असताना तिने चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगावच्या ज्ञानेश कला महाविद्यालयात प्रवेश मिळविला तिथं शिक्षण घेत असताना तिला अनेकांचे मार्गदर्शन लाभले! 

      आज ती नुसतीच चित्रकार म्हणून नाही तर एक उत्तम चित्रकार म्हणून ओळखल्या जात आहे.

      याच उच्च शिक्षित पुनमने मध्यंतरी इटली येथे पार पडलेल्या एका भव्य चित्रकला स्पर्धेत भाग घेवून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले! त्यामुळे साहजिकच तिच्या सोबत वणी शहराचे नाव रोशन झाले.

      आपल्या कुंचल्यातून अनेक सुंदर,सुरेख व मनोवेधक चित्रे रेखाटलेल्या पुनमला आपल्या कलेसाठी अनेक सन्मान पुरस्कार प्राप्त झाली आहे,तर काही ठिकाणी तिचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार देखील झाला आहे.

सध्या ती वणीच्या एका खासगी शिक्षण संस्थेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे.भविष्यात आपल्या हातून उत्तम चित्रकार घडावे अशी पुनमची मनोमन इच्छा आहे.

        चित्रकलेसाठी नेहमीच कुटूंबातील सदस्यांचे प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी आज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

       महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप ग्रुपच्या पुनम वासाडे या एक सदस्य आहे.त्यांच्या कुंचल्यातून साकारलेली विविध लक्षवेधक चित्रे या ग्रुपच्या माध्यमातून आपणांस बघावयास मिळते असे जेष्ठ मार्गदर्शिका मायाताई कोसरे या वेळी म्हणाल्या! 

    अनेकांनी त्यांच्या कलेचे अभिनंदन करीत कौतुक केले आहे.