बेलगाव ते पन्नेमारा,पन्नेमारा ते सिदेंसूर,पन्नेमारा ते मुरुमगावं मार्ग चे डांबरीकरण करण्याची मागणी…

भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधि 

         धानोरा तालुक्यातील अतिसंवेदनशील विभागातील पन्नेमारा ग्रामपंचायत अतंर्गत बेलगाव ते पन्नेमारा , पन्नेमारा ते सिदेंसूर, पन्नेमारा ते मुरुमगावं मार्ग चे डांबरीकरण करण्यात यावे. म्हणून याची मागणी कॉंग्रेसचे महिला आघाडी तालूका अध्यक्ष, सरपंच ग्रामपंचायत पन्नेमारा शेवंताताई हलामी यांनी मागणी केलेली आहे.

        पन्नेमारा ग्रामपंचायत अतंर्गत येनारे मौजा- सिदेंसूर, रिङवाही, उमरपाल, केहकावाही, केसकावाही मसाद या गावातील मुख्य मार्गावर आतापर्यंत डांबरीकरण करण्यात आलेले नाही त्यामुळे जाणारे – येणारे नागरिकांना याचा त्रास होत आहे. 

          याच मार्गावर लहान,मोठे कलवट बांधलेले नाही त्यामुळे या क्षेत्रातील जनतेची भर पावसाळ्यात जाणे येण्याचा मार्ग बदं होत असते. संपर्क खंडीत होऊन याचा नागरीकानां मौठा त्रास सहन करावा लागतात. तसेच गरोदर मातानां व बाळंत मातांना दवाखान्यात आणण्याकरीता त्रास सहन करावा लागतो.

        या गंभीर विषयावर चर्चा करून पन्नेमारा ग्रामपंचायतचे व महिला आघाडी अध्यक्ष व सरपंच शेवंताताई हलामी व पदाधिकाऱ्यांकडून व परिसरातील नागरिकांकडून ग्रामसभा आयोजन करण्यात आली. 

           या ग्रामपंचायत अतंर्गत येणारे सर्व मार्गावर डांबरीकरण व कलवट निर्माण कार्य करण्यात यावे असे ठराव मंजूर करून पारित करण्यात आले. याची प्रोसेसिंग  करण्यात आले. पदाधिकाऱ्यांकडून व परिसरातील जनते कडून मागणी करण्यात आली आहे.