कोटलडोहचा जगंलात रानडूकराचा हल्ल्यात तेंदूपत्ता मजूर गंभीर जखमी… 

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

          तेंदूपत्ता संकलनाकरीता जगंलात गेलेल्या मजूरावर रानटी डूकराने हल्ला चढवल्याने मजूर गंभीर जखमी झाल्याची घटणा चारभट्टी जवळ असलेल्या कोटलडोह चा जगंलात आज दि १५ मे बूधवार रोजी सकाळी ८.३० वाजेचा सूमारास घडली.

            चारभट्टी येथील मजूर रतिराम तूळशीराम नरेटी वय ५३ हे सहकारी मजूर व कूटूंबातील इतर सदस्यासह कोटलडोह गावाशेजारील जगंलात तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत असताना अचानक रानटी डूकराने त्यांचावर हल्ला चढविला.

         यावेळी त्यानी बचावाकरीता आरडा ओरड केल्याने सहकारी मजूरानी मदतीकरीता घटणास्थळाकडे धाव घेतली त्यामूळे डूकर तिथून पळून गेला मात्र या हल्ल्यात नरेटी गंभीर जखमी झाले.

       त्यांचा हात व पायावर खोल व गंभीर दूखापत झाली आहे. त्यांचावर येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने पूढील उपचाराकरीता जिल्हा सामान्य रूग्नालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.

      दरम्यान पूराडा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिघोरे यानी उपजिल्हा रूग्णालयात भेट देत जखमीची विचारपूस करीत आवश्यक शाशकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.