दर्यापूरातील आठवडी बाजार येथील अतिक्रमण धारकांवर फिरला बुलडोजर…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक

खल्लार :- दर्यापूर शहरातील आठवडी बाजार येथे करण्यात आलेले अतिक्रमण आज १५मे रोजी दुपारच्या सुमारास नगरपरिषद येथील मुख्यधिकारी नंदू परळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हटविण्यात आले आहे. 

      दर्यापूर शहरात आठवडी बाजार दर गुरवारला भरत असतो.तालुक्यातील नागरिक बाजार करण्यासाठी व इतर कामासाठी येतात आठवडी बाजारात अतिक्रमण केल्यामुळे तो बाजार पूर्णतः रस्त्यावर भरत असल्यामुळे बाजारातून वाहतुकीस खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता.

          बाजार करत असताना साधे पायी सुद्धा जाता येत नव्हते असे मुख्याधिकारी नंदू परळकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे. ज्याने कोणी अतिक्रमण केलेले असेल त्यांच्या वरती योग्यरीत्या कार्यवाही करण्यात येणार आहे.