माऊली धांडे येथे जप्त केलेला वाळू साठा घरकुल लाभार्थ्यांना वाटप….

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

           दर्यापूर तालुक्यातील माऊली धांडे व नांदुरा येथील जप्त केलेला वाळू साठा ( १० ब्रास वाळू )ग्राम नांदुरा पुनर्वसन व माऊली धांडे येथील घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेला आहे.

         दर्यापूर तालुक्यातील एकही घाटचा लिलाव न झाल्यामुळे वाळू माफिया यांना सुगीचे दिवस आलेले आहेत असे दिसून येत आहे.

           त्याच अनुषंगाने चार ते पाच दिवसा अगोदर नांदुरा येथील तलाठी सुजाता कडू यांची दबंग कार्यवाही करून साठवण केलेला वाढू साठा तलाठी यांनी वेळीच पंचनामा करून त्या साठवलेल्या वाळूचा घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेला आहे.

          घरकुल लाभार्थ्यांनी महसूल प्रशासनाचे व तलाठी यांचे आभार व्यक्त केलेले आहे.