समुद्रपुर डी.बी.पथकाची मोठी कार्यवाही…

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधि वर्धा..

       वर्धा :– हकीकत या प्रमाणे आहे की,28 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन समुद्रपुर स्टेशनचे थाणेदार पो.नि.संतोष शेगांवकर यांना खात्रिशिर माहिती मिळाली की मोजा वाकसूर शिवारातील वणा नदीच्या पात्रातुन काही इसम हे जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर मध्ये बिना पास- परवाना काळी रेती चोरी अन्वये वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली.

      थानेदार यांचे मार्गदर्शनात पो. स्टे.समुद्रपुर डी.बी.पथकांनी स्थळावर जाऊन अरोपिंची नाकाबंदी करुन त्यांचे त्याब्यातून एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर ट्रालीसह वणा नदीच्या पात्रातून जप्त केले.

          टॅक्टर मध्ये चोरन भरलेली दोन ब्रास काळी रेती असा जुमला किंमत 41 लाख 10, हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुंन आरोपी नामें युवराज रामहरि कारामोरे,रा.कानकाटी,श्रावण रामचन्द्र सिदाम,रा.हरणखुरी,प्रकाश वसंत पाटिल रा.कानकाटी,नरेश विठलराव धोटे रा.रामनगर,दिनेश श्रावण सराटे रा.रामनगर,ता.समुद्रपुर,जिल्हा वर्धा यांचे विरुद्ध पोलीस स्टे.समुद्रपुर येथे कलम 397,34 भादवी,सह कलम 3 (1) 181,50 (1)133/177 मो.वा.का.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरु आहे.

          सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रौशन पंडित यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नि.संतोष शेगांवकर थानेदार पोलीस स्टेशन समुद्रपुर यांचे मार्गदर्शनात डी.बी. पथक प्रमुख पोलीस नाईक प्रमोद थूल,सचिन भालशंकर,पोलीस अमलदार प्रमोद जाधव,समीर कुरेशी यांनी केली आहे.