“दखल न्यूज भारत” ने बातमी प्रकाशित करताच नादुरुस्त बोअरवेलच्या दुरुस्ती कामाला सुरुवात.. — दखल इम्पॅक्ट.. 

     राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा..

       कुरखेडा शहरांतर्गत बाजारवाडीतील मागील तीन आठवड्यापासून बोअरवेल नादुरुस्त अवस्थेत होती.

       त्या बाबतीत स्थानिक व्यवसायीक यांनी आपली व्यथा नगरपंचायत प्रशासनाला पत्रव्यवहार करून सांगितले.परंतू आचारसंहितेचे व निवडणुकीचे कारण सांगून वेळ मारून नेत होते. 

        दखल न्युज भारत वेब पोर्टलचे कुरखेडा तालुका प्रतिनिधी राकेश चव्हाण यांच्याकडे संबंधित नागरिकांनी ना दुरुस्त बोरवेल संबंधाने व्यथा मांडली.

       मुलभूत अधिकारांतर्गत येत असलेल्या पाणी समस्या बाबत पत्रकार राकेश चव्हाण यांनी ना दुरुस्त बोरवेलची दखल न्यूज भारत वेब पोर्टल ला बातमी प्रकाशित करताच नगरपंचायत प्रशासनाला जाग आली व दुपार पासून सदर बोरवेल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. 

        लाखोचा कर बाजार लिलावातून प्राप्त होत असताना बाजारवाडीतील बोरवेल दुरुस्तीला निधी उपलब्ध करून देण्यास अवधी का लागतो?असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.