अब की बार 400 पार होणार म्हणजे होणारच?…. — नागरिकांचे अधिकार-हक्क धोक्यात…

      “2014 मध्ये काँग्रेसच्याही अहंकारातून झालेल्या चुकामुळे ( एकाच व्यक्तीला दोनदा प्रधानमंत्री बनविणे हे लोकशाहीला घातकच ) आणि मोदीच्या अच्छे दिन च्या नाऱ्याने मोदी लाट आली, भाजपचे सरकार आले.

       गुजरात पॅटर्न मूळे जनताही भुलली,एक नवीन प्रयोग म्हणून जनतेने मान्य केले.पण तरी सुद्धा जनतेच्या भुवया उंचावल्या,की ज्या जोडीने संपूर्ण भाजप उभारला त्या माजी प्रधानमंत्री अट्टल बिहारी वाजपेयी आणि माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यापैकी राहिलेल्या अडवाणी यांना ती संधी मिळेल……..

        परंतू ,तसे न होता RSS व भाजपने मोदींचा चेहरा पुढे केला ( गोध्रा हत्याकांडाचा अनैतिक आरोपी याने स्वतःचा चेहरा दहशतीच्या जोरावर इतरांच्या मदतीने समोर आणायला पक्षाला भाग पाडले ) आणि इथेच देशाची फसगत झाली.पहिल्या पाच वर्षात मोदी पायाला भिंगरी लावून बिन बुलाए मेहेमान सारखे जगभर फिरले.प्रधानमंत्री झाल्यामुळे अमेरिकेने गोध्रा हत्याकांडामुळे 10 वर्षाची घातलेली प्रवेश बंदी उठवावी लागली. 

        हे महाशय ऊठ सुठ या देशातून त्या देशात पहिले पाच वर्षे फिरत राहिले.या धावपळीत 2014 च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने विसरून गेले. जाब विचारण्याची संधी पत्रकारांना किंवा जनतेला कधी दिलीच नाहीं.कारण मन की बात जनतेवर लादली आणि एकही पत्रकार परिषद घेतली नाहीं. शिवाय कोणत्याही मंत्र्याला स्वतंत्र अधिकारच काय तर त्यांच्या अभिव्यक्तीवर सुद्धा या महाशयांनी गदा आणली होती.अर्थात,”मोदी है तो मुमकिन है,”मोदी की ग्यारंटी,”मोदी – मोदी, ही घोषवाक्य झाली. याच पहिल्या पाच वर्षात विरोधकांना कायमचे संपवण्याचा म्हणजेच लोकशाहीतुन हुकूमशाही निर्माण करण्याचा पाया रचल्या गेला.

        त्याचबरोबर प्रशासन व्यवस्था ताब्यात घेण्यास सुरुवात केली आणि तो त्यात यशस्वी सुद्धा झाला.जोडीला अमित शहाला घेऊन कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ,न्यायमंडळ आणि पत्रकारिता सुद्धा ( लोकशाहीतील सर्वच जबाबदार घटक ) यांचे हळू हळू अपहरण करून आपले वर्चस्व निर्माण केले. ( जज लोयाची हत्या करून ). 

        पत्रकारांना हतबल करण्यासाठी त्यांची चॅनेल्स अदानीना खरेदी करायला लावून पत्रकारितेचे पंख छाटले. उरलेल्याना ( जे शरण गेले ) गोदमध्ये घेतल्यामुळे ” गोदी मीडिया ” निर्माण झाली.

         एकंदरीत पहिल्या पाच वर्षात मोदीने आपला पाया पक्का केला. नोटबंदी त्याचाच एक भाग होती. CBI, ED च्या मदतीने RBI, CAG, मुख्य निवडणूक आयोग, देशातील उच्चं न्यायालयातील न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांच्या जागांवर सुद्धा आपली सोईची माणसे बसविली. कठपुतळी बाहुलीप्रमाणे राष्ट्रपतीपदाची खुर्ची बनविली. म्हणजे पहिल्या पाच वर्षात संपूर्ण व्यवस्था आपल्या हातात घेतल्यानंतरच अब की बार 300 पारचा नारा 2019 पूर्वी देण्यात आला.

            2019 मध्ये पुन्हा खोट्या आश्वासनांचा पाऊस पडला. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येकाला पक्की घरे मोफत मिळतील.पुन्हा मोदीची ग्यारंटी सुरु झाली.आणि यावेळी मात्र EVM वर सेटिंग करून त्याच्याच जोरावर अब की बार 300 पारचा नारा देण्यात आला. 

        तोपर्यंत जनतेच्या व विरोधकांच्या या बाबी कदाचित लक्षात आल्या नसतील. जेंव्हा केवळ EVM च्याच बळावर 300 पारचा नारा यशस्वी झाला, आणि 2019 मध्ये पुन्हा मोदी सरकार आले. तेंव्हा तर काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून सुद्धा मान्यता राहिलेली नव्हती. विरोधक एकत्र येऊन विरोधी पक्ष बनला. आता मात्र मोदी है तो सब मुमकिन है. या नाऱ्याला सुरुवात झाली.

           2014 ते 2019 च्या काळातील भारत आणि 2009 ते 2014 च्या काळातील भारताची सर्वच आर्थिक,सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक,आर्थिक इ. क्षेत्रातील झालेली दयनीय स्थिती आता केवळ राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नव्हती.तर यामध्ये जनता व बुद्धीजीवी वर्ग सुद्धा गांभीर्याने पाहात होता.

          परंतू,बघ्याच्या भूमिकेपलीकडे जाण्यासाठी कुणी धजत नव्हते.जनतेची व या वर्गाची आणि विरोधकांच्या अशा मानसिकतेमुळे मोदी शहाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आणि त्यांनी या देशात दहशतीच्या राजकारणाला सुरुवात केली.

        म्हणजे देशाला गुजरात करण्याचे निश्चित केले.यातूनच अदानी,अंबानी सारख्या उद्योजकांना हाताशी धरून देशाची सार्वजनिक मालमत्ता विमान कंपन्या,रेल्वे, कॉर्पोरेट क्षेत्रे यामध्ये खाजगीकरनाला वाव दिला.एवढेच काय आरोग्य व शिक्षण आणि संरक्षण यासारख्या आवश्यक सेवामध्ये सुद्धा खाजगीकरण करून देशातील ” राष्ट्रवाद ” संपविण्याचा घाट घातला.  

          मणिपूर मधील नैसर्गिक संपत्ती उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी तेथे वांशिक वाद उफाळून आणला.कारगिल मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या सहचारिनींची नग्न धिंड काढून दीडशेच्या वर जमावाने कुकर्म केले.परंतू ,यावर मोदी शहा एक चकार शब्दही संसदेत वा निवडणुकीच्या प्रचारात बोलत नाहीत.

“देशही बोलत……..

जनताही गप्प……

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच देशाची राज्यघटना लिहिली होती का?

        याच देशात म.गांधी,पं. नेहरू,मौलाना आझाद,म.फुले,सावित्रीबाई फुले,छ.शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज होऊन गेलेत का………?

    एवढी आम्ही ( 140 कोटी जनतेची ) संवेदनशीलता आमची कायमची मारून टाकली का……..?

       या अशा आमच्या मानसिकतेमुळेच या देशात क्रांती होऊ शकत नाही,या ब्रिदावर शिक्कामोर्तब झाले……!

           पण तरी सुद्धा आमच्या पंजाबच्याच शेतकऱ्यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले तीन कृषी कायदे याच मोदी शहाला मागे घ्यायला भाग पाडले.परंतू , त्यासाठी 750 च्या वर शेतकऱ्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली.दीड वर्षे आंदोलन चालले.परंतू,मोदी शहा यावर मौन धारण करतात,आणि 2024 निवडणुक प्रचारात मोदी की ग्यारंटीवर जनता अजूनही टाळ्या वाजवतात!

      यामुळेच संपूर्ण व्यवस्था,विरोधी पक्ष,जनता यांना हायजॅक करून या मोदी शहानी केवळ आणि केवळ EVM च्या बळावर सेटिंग करून EVM बनविणाऱ्या कंपनीत आपले 7 पैकी 4 संचालक नेमून,त्यासाठी चिनच्या कंपन्यांशी करार करून, आपल्या सोईनुसार अब की बार 400 पार कसे आणता येईल यावरच लक्ष केंद्रित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

          त्याची सुरुवातच विनाकारण 20,000 कोटी रुपये खर्च करून सेंट्रल विस्टाची निर्मिती करणे,राष्ट्रपती ऐवजी धर्मप्रसारकांच्या हातून सेंगोलची प्रतिष्ठापणा करणे.

        या गोष्टी जेंव्हा बुद्धीजीवी वर्गाच्या लक्षात आल्या. जनतेच्या लक्षात येऊन उपयोग नव्हता. परंतू,जनतेला वैचारिक नेतृत्वाची आवश्यकता असते.म्हणून प्रथम या बाबी जेंव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघाच्या लक्षात आल्या यामध्ये आदरणीय ऍड.प्रशांत भूषण सर,आदरणीय. ऍड.नरेंद्र मिश्रा सर,आदरणीय. ऍड.भानुप्रताप यादव सर,आदरणीय.ऍड.मोहमद प्राचा सर,त्याचप्रमाणे आदरणीय. वामन मेश्राम सर आणि देशातील प्रत्येक राज्यातील अनेक बुद्धीजीवी वर्गाने याच EVM च्या विरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढण्यास सुरुवात केली.आंदोलने,उपोषण,निदर्शने,मोर्चे,संपूर्ण देशात झाले. 

           परंतू गोदी मीडियामुळे प्रसिद्धी मिळू शकली नाही.परंतू समाज माध्यमानी त्याला प्रसिद्धी दिली.मात्र हे आंदोलन पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी होऊ दिले नाही.विरोधी राजकीय पक्षांनी सुद्धा गंभीरपणे हा जनतेचा मुद्दा उचलून धरलेला नव्हता. परंतू , बुद्धीजीवीवर्ग मात्र जनतेच्या ” मताच्या मूलभूत हक्कासाठी ” रस्त्यावर उतरलेला होता. परंतू , न्यायालयाने सुद्धा ठरवून टाकले होते की काय की काहीही झाले तरी EVM शिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत. 

        म्हणूनच हे आंदोलन अयशस्वी झाले आणि आमचा ( 140 कोटी ) जनतेचा मताचा अधिकार EVM ने हिरावून घेतला. ज्या EVM ला जगाने अनुभव घेऊन लाथाडले.

        हे सर्व का घडले याचा सारांशरूपाने विचार केला असता हे लक्षात येते की, क्रांती – प्रतीक्रांतीचा हा संघर्ष गेल्या हजारो वर्षापासूनचा आहे. सम्राट हर्षवर्धनानंतर 1350 वर्षे प्रतीक्रांतीची लाट होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा संविधान व धम्मचक्र प्रवर्तन करून क्रांती केली. ही केलेली क्रांती प्रतीक्रांतीवाद्याच्या जिव्हारी लागली.

         म्हणूनच RSS ने मोदी शहा यांना हाताशी धरून भाजपच्या मदतीने पुन्हा एकदा प्रतीक्रांतीची लाट आणू पाहते आहे. यात ते कितपत यशस्वी ठरतील ते काळच ठरविल.

     यासाठीच अब की बार 400 पार होणार म्हणजे होणारच!

        ज्याप्रमाणे 100 वर्षांपूर्वी RSS ने त्यांच्या प्रतीक्रांतीसाठी कष्ट घेतले,त्यापेक्षा जास्त कष्ट आपल्याला संविधान क्रांती टिकविण्यासाठी घ्यावे लागतील. तेंव्हा कुठेतरी थोडासा आशेचा काजवा चमकेल.

    त्यासाठी मी तयार आहे तुम्ही आहात का.?

             आवाहनकर्ता

             अनंत केरबाजी भवरे

     संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689…