एसीपी सिंह यांची पालांदुरात रात्रोच्या वेळी धडक कारवाई..  — साकोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कारवाई सत्राने वाळूमाफीया हादरले… 

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक

साकोली : उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंह यांच्या धडक कारवाईमुळे आता रेती तस्करांचे धाबे दणाणले असून लाखनी तालुक्यातील नरव्हा रेती घाटावरून अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्यांवर १३ मे च्या रात्री ११:३० वा. दरम्यान धडक कारवाई करीत शासनाचा महसूल बूडवित गौण खनिज वस्तुंच्या चोरी प्रकरणी ही कारवाई केली आहे.

         साकोली उपविभाग,सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत सिंह व यांच्या चमुने लाखनी तालुक्यातील नरव्हा नदी पात्रामधुन अवैधरित्या वाळू नेत असता चोरीचा ट्रैक्टर मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करीत ट्रैक्टर पालांदुर स्टेशन जमा केला.

        घटनेत उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंह यांनी मौजा नरव्हा ता.लाखनी पो.स्टे .पालांदुर येथे अवैधरीत्या ३ रेती ट्रॅक्टर पकडले.त्याची किंमत १३ लाख ५०,०००/- रु. असून पोलीस स्टेशन पालांदुर येथे वाळू चोरांवर कलम ३७९,५११,१०९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद केला. 

        या कार्यवाहीत स्वतः एसडीपीओ सुशांत सिंह, पीएसआय माधव परशुरामकर, पो.हवा. कुरुडकर,पो. हवा.गुरव, पो.नायक स्वप्निल गोस्वामी व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील चमुने ही धडक कारवाई केली.