शिवसेनेच्या (उबाठा गट ) च्या वतीने कुरखेडा जुना बस स्थानक वर पाणपोई सुरू..

     राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा

       कुरखेडा जुना बस स्थानकच्या आस पास छोटे मोठे चहा पान ठेला दुकाने होती.

       परंतु नुकतेच हायवेचे काम सुरू झाले,नाली बांध काम सुरू झाल्याने सर्व दुकाने दूर इतरत्र हलविली.त्यामुळे बाहेर गावून येणाऱ्या लोकांना प्रवाशाना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती.

         सदर पाण्याची समस्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली.लगेच उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांतंर्फे काल 13 मे ला पाणपोई सुरू करण्यात आली.

         सदर पाणपोईचे उ्दघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी उपजील्हा प्रमुख महेंद्र कुमार मोहबंसी,नगर सेवक अशोक कंगाली,ज्येष्ठ शिवसैनिक राकेश चव्हाण,उल्हास देशमुख,देवेंद्र मेश्राम,आशिष चुधरी,आशिष बारई,अशोक बंसोड,व कालीपिवली संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.