तेंदूपत्ता मजूरावर हत्तीचा कळपाचा हल्ला,मजूरांची दानादान, पळापळ…

 

   राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

    कुरखेडा तालुक्यातील घाटी वनकम्पार्टमेन्ट क्र. २९७ येथे काल सकाळी ९.३० वाजता दरम्यान तेंदूपत्ता संकलन करणार्या मजूरावर रानटी हत्तीचा कळपाने हल्ला चढवल्याने मोठी दानादान, पळापळ झाली.यावेळी एका मजूराने जिव वाचविण्याकरीता झाडावर आश्रय घेतला मात्र हत्तीनी हा झाडच मोडल्याने तो झाडासह जमीनीवर कोसळला मात्र या विपरीत परीस्थीतही त्याने आपला तोल ढळू न देता तिथून पळ काढल्याने त्याचा जिव बचावला.

             तालूक्यातील घाटी येथे तेंदूपत्ता संकलना करीता गावातील जवळपास साडे तिनशे मजूरांचा जत्था आज पहाटेचा सूमारास नजीकचा जगंलात डोंगरी जवळ गेला होता यावेळी संकलनाचे काम सूरू असताना याचवेळी किंचाळत हत्तीचा कळप त्यांचा दिशेने येत असल्याची कूणकूण मजूराना लागताच त्यानी तोडलेली पाने साहित्य तिथेच ठेवत पळ काढत आपला जिव वाचविला मात्र यावेळी घाटी येथीलच मजूर ईश्वर भोयर वय ५५ हा आपली मोटारसायकल जेथे ठेवली होती तिथे गेला असता रानटी हत्तीचा वेढ्यात सापडला.त्याने तिथे एका झाडावर चढत जिव वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र हत्तीचा कळपाने तो झाडच मोडल्याने तो झाडासह जमीनीवर कोसळला मात्र त्याचे दैवबलवत्तर जखमी अवस्थेतही त्याने तिथून मोठ्या शिताफीने पळ काढला व आपला जिव वाचविला यावेळी पळापळ झाल्याने अनेक मजूरांचा दूचाक्या, सायकल व इतर साहित्य जगंलातच पळून होते. 

           घटनेची माहीती मीळताच‌‌ वनविभागाचा चमूने घाटी गावाकडे धाव घेतली यावेळी संतप्त मजूरानी वनकर्मचार्याना घेराव घालत रानटी हत्तीचा कळप गावाशेजारी पोहचला असल्याची सूचणा मजूराना देत तेंदूपत्ता संकलन बंद ठेवण्याचे आवाहन का करण्यात आले नाही? असा सवाल करीत त्याना धारेवर धरले या प्रकरणात वनविभागाचा पूर्णपणे दूर्लक्षपणा कारणीभूत आहे असा आरोप सूद्धा गावकर्याकडून करण्यात आला आहे. पुढिल जखमी मजुरास स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.