ब्रेकिंग न्यूज… — अस्वलीच्या हल्यात एक बालक जखमी…                       

ऋषी सहारे 

  संपादक

          कोरची मुख्यालयापासुन 45 कि.मी.अंतरावर सोनपुर ग्रामपंचायत अतर्गत गोडरी गावात दरवर्षी पानतोंडणी कामे केला जातो.यावर्षीसुध्दा 6 मे पासुन पानतोंडणी सुरूवात करण्यात आली. आज गोडरी गावापासुन‌ 3 कि.मी.अंतरावर पानतोंडणीचे पुडे बांधण्यासाठी वाक आनायला आपल्या वडील व काकाजी सोबत जंगलात गेलेल्या हर्षद गणपत नरोटे वय 12 वर्ष या लहान मुलावरती आस्वलीने हल्ला चढविला.

           अर्षदने आरडाओरडा केली असता सोबत असलेले वडील गणपत नरोटे वय 45 व काकाजी संपत नरोटे वय 40 रा.गोडरी हे धावुन गेले व आस्वलीला हाकलून ताबड़तोड़ त्यांनी कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. लगेच डॉ. काजल नाकाडे वैघकिय अ‌धिकारी कोटगुल, अर्चना येरमे सिस्टर,श्रावण घोडाम परिचर, जाणिक गंधेल परिचर,डि.एन.सहारे( H. A) यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. 

       प्राप्त माहिती नुसार गोडरी हे गाव मालेवाडा वनपरिक्षेत्र मध्यें येतात पण घटनेच्यावेळी कोटगुल येथे कोणतेही वनविभागाचे कर्मचारी वृत्त लिहे पर्यंत जखमीला भेट दिन्यासाठी आलेले नव्हते. परिसरात गोडरी गावात आस्वलानी‌‌ जखमी केलेली‌ दुसरी घटना आहे.त्यामुळे गावात भितींचे वातावरण आहे. 

       वनपरिक्षेत्र मालेवाडा यांनी घटना स्थळी जावुन पंचनाम करुन जखमी झालेल्या हर्षद गणपत नरोटे वय 12 यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी गावकरी लोकांनी केली आहे.