अवैध सुगंधित तंबाकू तस्करी वर भद्रावती पोलिसांची बेधड़क कारवाई….

     उमेश कांबळे

तालुका प्रतिनिधि भद्रावती

        दि 6 मे ला दुपाराच्या सुमारास् गुप्त माहितीच्या आधारावर गुरुनगर, चिचोर्डी येथे आशीष वाकडे यांचे घरी विक्री करण्यासाठी अवैध सुगंधित तंबाकूचा साठा असल्याची माहिती लागताच भद्रावती पोलिसानि १,७१,४२० रू चा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपी ला अटक करण्यात आली आहे.

        प्राप्त माहितीनुसार पोहवा अनूप आस्टूनकर यांना मुखबीराकडून माहिती मीडाली की गुरुनगर चिचोर्डी,येथे आशीष वाकडे यांचे घरी अनूप गेडेकर याने घराचे बांधकाम सुरु असलेल्या स्वयंपाक खोलीत विक्री करन्याकरिता मजा व ईगल अवैध सुगंधित तंबाकूचा साठा केला आहे. घराचे तपासनी दरम्यान मजा १०८ व ईगल तंबाकू असा एकुन १,७१,४२० चा मुद्देमाल भद्रावती पोलिसानी जप्त केला आहे. त्यात आरोपी अमोल गेडकर वय २७, डोलारा तलाव आणि दूसरा आशीष वाकडे वय ३०, चिचोर्डी, भद्रावती यांना कलम ३२८,१८८,२७२,२७३,३४ भादवि सहकलम अन्न व सुरक्षा कायदा २००६ अतर्गत कलम ३०/२, २६,२ ऐ, ३,४, ५९ आय नुसार गुन्हा नोंदवुन अटक करण्यात आली आहे.

         सदरची कारवाई उप विभागीय पोलिस अधिकारी वरोरा, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे, सफौ गजानन तुपकर , पोहवा अनूप आस्टूनकर, नापोअ जगदीश झाड़े, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुदरी यानी केली आहे.