मृत्यूशी झुंज देणारी अल्पवयीन प्रेयसीचाही मृत्यू…

ऋषी सहारे

  संपादक

         आरमोरी येथील बर्डी परीसरात घडलेल्या प्रेमीयुगुलांच्या आत्महत्येप्रकरणात ती मृत्यूशी झुंज देणाऱ्या अल्पवयीन युवतीचाही मृत्यू झाल्याने व युवतीचे पोलिसांनाही बयाण न मिळाल्याने नागरीकात संभ्रम निर्माण झालं आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट करण्याचे आव्हान पोलीसासमोर उभे ठाकले आहे.

            आरमोरी येथील शिवाजी चौकातील राहुल सावसाकडे सध्या हे आरमोरी बर्डी येथील एका महिलेच्या घरी दिनांक १५ मे रोजी दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.३० वाजताच्या आपल्या अल्पवयीन प्रेयसीसह गळफास घेतला. यामध्ये तो ठार झाला.

         मात्र यात १७ वर्षीय प्रेयसी बचावली होती. तिच्यावर ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिचे बयान घेण्यासाठी गेले होते. मात्र आज दिनांक १८ में रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान उपचाराअंती तिचे निधन झाले. या प्रेमीयुगलांच्या आत्महत्येचे मृत्यूचे गूढ मात्र अद्यापही कायम आहे.

         प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी १५ मे ३.३० वाजता हे दोघेही आपल्या पालकांना कुठलीही माहिती न देता तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या एका महिलेच्या घरातील एका रूममध्ये एकत्र आले. दुपारी ४.३० वाजता त्याने एका मित्राकडून बिर्याणी मागवून घेतली. त्याच्या मित्राने बिर्याणी आणुन देऊन तो परत निघून गेला.

          मित्रांनी त्याला फोन केला असता, फोनची रिंग जात होती. परंतु त्याला काहीही प्रत्युत्तर मिळाले नाही. त्यावेळी त्याच्या मित्रांनी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान ते असलेल्या खोलीकडे गेले असता, खोलीचा दरवाजा बंद दिसून आला. त्याच्या मित्रांनी जोरजोराने दरवाजावर थापा दिल्या परंतु कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने एका मित्राने खोलीचा शटर उचलून आत प्रवेश केला असता, राहुलचे प्रेत स्लॅबच्या हुकला नॉयलानच्या दोर पंख्याला बांधलेला लोंबकळत होता.

            तर सदर अल्पवयीन युवती बेडवर बेशुद्ध होती. मित्रांनी त्या अल्पवयीन युवतीस आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले तिची प्रकृती खालावल्याने तिला ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केला.

          राहुल व त्याच्या प्रेयसीला आत्महत्या करायची होती तर त्यांनी परक्या महिलेच्या घरातील खोलीत जाऊन आत्महत्या का केली? असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. ज्या महिलेने आपली स्वतःची खोली उपलब्ध करून दिली त्या महिलेचे आणि या प्रेमीयुगलांचे काय संबंध होते?.. ज्या दिवशी या प्रेमीयुगलांनी आत्महत्या केली त्यावेळी ही महिला का हजर नव्हती असे अनेक प्रश्नांची सध्या आरमोरी शहरात चर्चा सुरू आहे. पोलीसांनी सदर महिला तसेच राहुल याच्या मित्रांची चौकशी केल्यास या प्रकरणाचे कोडे उलगडू शकेल असे बोलल्या जात आहे.

           दिनांक १८ मे रोजी दुपारी ४ दरम्यान ४ दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला सदर अल्पवयीन मुलीला १५ तारखेला ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तेव्हापासून ती बेशुद्धावस्थेत होती.

           पोलिस दोनदा ब्रम्हपुरी येथे गेले होते. परंतु ती अखेरपर्यंत बेशुद्धावस्थेत असल्याने बयान पोलिसांना मिळू शकले नाही. मात्र दोघांच्याही रहस्यमय मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे.