जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करावे व त्यांना प्रमाणपत्र द्यावे.:- राजू झोडे यांची मागणी..

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

              चंद्रपूर जिल्ह्यात बरेच दिव्यांग बांधव असून ते विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळें जिल्ह्यातील विविध घटकातील दिव्यांग बांधवांचे त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करावे व त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे,अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली असून तसे निवेदन सिव्हिल सर्जन यांना देण्यात आले आहे.

             जिल्ह्यात बरेच दिव्यांग बांधव असून त्यांचे अजूनही शासनामार्फत सर्वेक्षण झाले नाही.तसेच त्यांना विविध शासकीय कार्यालयात ये-जा करावी लागत असून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. 

           त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी राजू झोडे,श्यामभाऊ झिल्लपे, गुरू कामटे,मंगेश नौताम,शैलेश वनकर यांनी केली आहे.