तिस-यांदा महिला धडकले नगरपरिषदेवर…. — प्रकरण अजितबाबा समाधी चौकातील मैदानाचे…

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

साकोली : शहरातील प्रभाग क्र.५ मधील अजितबाबा समाधी चौक येथील मैदान मागील ३५ वर्षापासून नागरिकांसाठी खुले असून येथे नगर परिषदेने नागरिकांना व मुलांना वावरण्यासाठी बालोद्यान व झोपाळे लावले होते.

           पण काही समाजकंटकांनी या जागेवर अतिक्रमण करून बालोद्यान नष्ट करीत झोपाळे काढले व आवार भिंत बांधकामाचे काम सुरू केले व तणावाची स्थिती निर्माण झाली. येथील महिलांसह लहान मुलांनीही “झुले परत लावा आम्हाला झुले पाहिजे” असा आक्रोश केला.

          नगर परिषदेत महिला शिष्टमंडळाने चर्चा केली असता मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी १९ एप्रिल मतदान होऊ द्या लगेच झुले साहित्य लावतो असे आश्वासन दिले परंतु आजपर्यंत झुले का लागले नाहीत.? याकरिता महिला आता तिस-यांदा सोमवारी ता. ०६ मे ला नगरपरिषदेवर धडकल्या व झोपाळे लावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

           शहरातील अजित बाबा समाधी चौकातील बालोद्यान व झोपाळे का लागले नाही.? यात तेथील जनतेला विश्वासात घेतले का.? सार्वजनिक बालोद्यानातील मुलांचे खेळण्याचे झुले नगरपरिषदेने कुणाच्या परवानगीने काढले.? परवानगी आहे काय.? अशे संतप्त प्रश्न आता प्रभागासह साकोलीतील जनता करीत आहेत.

           दोन महिने उलटूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसून फक्त आश्वासन दिले जाते. कारण हे झुले उचलून नेत तेथे नेमके कोणते कार्य व जमिन उपयोगात आणली जाते आहे हे सुद्धा जनतेला साधी कल्पनाही नाही. यात भूखंड बळकाविण्याचे तर हे षडयंत्र नाही असाही सवाल जागृत जनता करीत आहेत.

            स्थानिक राजकीय नेत्यांचा दबावाखाली नगरपरिषद प्रशासन काम तर करीत नाही असा संतप्त सवाल नागरिकात उपस्थित झालेला आहे. येथील झुले दोन दिवसात लावण्यात यावे अन्यथा साकोली नगर परिषदेपुढे उपोषण व आंदोलन छेडण्याचा इशारा प्रभाग क्रमांक पाच व सहा येथील महिला व नागरिकांनी दिला आहे.

        “आज दि. ७ मे ला मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात मोका चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.”

                      स्वप्निल हमाने

प्रशासकीय अधिकारी नगर परिषद साकोली

              “चार ते पाच वेळा निवेदने देऊनही आम्हाला आश्वासन देतात परंतु कोणतेही प्रकारची कारवाई करीत नाहीत हा काय जनतेच्या निवेदनाचा तमाशा चालविला काय.? यात काही राजकीय दबावात नगरपरिषदेचे अधिकारी बाहुले तर बनले नाहीत ना.? हा भोंगळ कारभार तातडीने बंद करून येथील लहान मुलांच्या खेळण्याचे झोपाळे जैसे थे होते तशेच तेथे आणून लावा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे व ही जबाबदारी सर्वस्वी नगरपरिषदेची राहील.”

• संतप्त झालेले नागरिकांच्या या अश्याच प्रतिक्रिया आहेत.