ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची शिराळा येथे कीर्तन सेवेसाठी भव्य आणि दिव्य आयोजन… — शंभू महादेव यात्रा उत्सवा निमित्त कीर्तन सेवेसाठी हजारो टाळकरी व मृदंग वादक,व विणेकरी, यांची उपस्थिती…

बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         शिराळा तालुका परांडा येथे ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन सेवेसाठी भव्य आणि दिव्य आयोजन करण्यात आले आहे. शंभू महादेव मैदान शिराळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलेले आहे.

         सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 8 वजता शंभू महादेव मैदान या ठिकाणी किर्तन सेवा होणार आसल्यामुळे या भागातील सर्वच टाळकरी, विणेकरी, मृदुंग वादक ,ग्रामस्थ, भावी भक्त, श्रोते, मोठ्या संख्येने उपस्थित राहून किर्तन सेवेचा लाभ घेणार आसल्याचे विद्यमान सरपंच रेवनदादा ढोरे, सरपंच बालाजी बोंबलट व यात्रा कमिटीचे प्रमुख अध्यक्ष भारत आबा ढोरे, यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

         शिराळा गावामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा भव्य आणि दिव्य कीर्तन सेवेचा सोहळा होत आसल्यामुळे शिराळा गाव व आसपास परिसरातील व इतर गावातील ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कीर्तन सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा.

शिराळा गावचे प्रमुख मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक

          भावी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान सरपंच रेवनदादा ढोरे, सरपंच बालाजी बोंबलट, शंभू महादेव यात्रा कमिटीचे प्रमुख अध्यक्ष भारत आबा ढोरे, उपसरपंच शिवाजी ढोरे, प्रताप ढोरे, कुमार वाघमोडे, सदानंद बोंबलट, गहीणीनाथ सुरवसे, परशुराम ढोरे, महादेव नवले, प्रशांत उबाळे, सिताराम दबडे, प्रकाश पाटील, युवराज ढोरे, माऊली नवले, हनुमंत ढोरे, नितीन नवले, राजेश गायकवाड, योगेश नवले, बप्पा बोरकर, जनार्दन वाघमोडे, विलास सुतार, तुकाराम सुतार, लक्ष्मण ऊकिरडे हे प्रमुख मान्यवर व शिराळा येथील सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीत ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची कीर्तन सेवा भव्य आणि दिव्य उत्कृष्ट आवाजात होणार आहे.

आयोजक:- शंभू महादेव यात्रा कमिटी व शिराळा येथील सर्वच ग्रामस्थ