बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.राजेंद्र उमाप…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक

पुणे : महाराष्ट्र राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी पुणे येथील अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी त्यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची दोनदा संधी मिळाली आहे. सध्याही ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांना आता अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. 

         या बार कौन्सिलमध्ये महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्ये आणि दादर नगर हवेली आणि दिव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. दोन लाखाहून अधिक वकील या संघटनेचे सभासद आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ते सध्या महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त आहेत. तसेच ते चिंचवड देवस्थानचे ट्र्स्टचेही विश्वस्त आहेत. ज्यामध्ये मोरगाव, सिध्दटेक आणि थेऊर अष्टविनायकचा समावेश आहे. याशिवाय विविध पदे ते भूषवित आहेत.

         वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. वकिलांची सुरक्षितता, आरोग्य विषयक आणि इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे उमाप यांनी सांगितले.