समाज प्रबोधनकार भावेश कोटांगले यांना शिर्डी येथे साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित…

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधि 

        साकोली – तालुक्यातील एकोडी येथील रहिवासी समाज प्रबोधनकार भावेश कोटांगले यांना दिनांक 3 मे २०२४ ला शिर्डी येथे ओम साई प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भावेश कोटांगले यांना 2024 चा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सुदाम संसारे अध्यक्ष, वंदना गव्हाणे, मॉडेल अभिनेत्री सानवी वासनिक, डॉ.रवींद्र पाटील ,डॉ.अजय वरुळकर ,यांच्या उपस्थितीत सिद्धी संकल्प लान्स साकुरी शिर्डी येथे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ, मेडल व मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले.

            त्यांना मिळालेल्या साई कलारत्न पुरस्कारा बद्दल प्रबोधनकार मनोज कोटांगले व प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत एकोडी येथील सर्व पदाधिकारी, परिसरातील मित्र ,मैत्रिणी, कलावन्त यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.