माऊलींच्या रथाच्या बैलजोडीचा मान यंदा कुऱ्हाडे घराण्याला… — वस्ताद सहादू बाबूराव कुऱ्हाडे यांना बैलजोडी जुपण्याचा मान…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीचा मान यंदा आळंदीतील कुऱ्हाडे घराण्याला मिळाला असुन कुऱ्हाडे घराण्यातील प्रगतशील शेतकरी सहादू बाबूराव कुऱ्हाडे (वस्ताद) यांना बैलजोडीचा मान देण्यात आला असल्याचे आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले आहे.

          माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील कुऱ्हाडे, घुंडरे, भोसले, वरखडे, वहीले, रानवडे कुटुंबालाच मिळतो, आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण ही प्रथा खूप काळापासून अशी चालूं आहे.असे बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी सांगितले. 

         बैलजोडी समितीची बैठक काही दिवसांपूर्वी आळंदीत झाली. त्यावेळी बबनराव कुऱ्‍हाडे, नंदकुमार कुऱ्‍हाडे, विलास घुंडरे, शिवाजी रानवडे, रामचंद्र भोसले, ज्ञानेश्वर वहीले, रमेश कुऱ्हाडे यांच्यासह सर्व सदस्यांची हजेरी होती. बैठकीदरम्यान कुऱ्हाडे कुटुंबातून पाच अर्ज आले होते त्यातून सर्वानुमते बैलजोडी जुंपण्याचा मान सहादू बाबूराव कुऱ्हाडे (वस्ताद) यांना मिळाला आहे. यावेळी मंदिरात व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बैलजोडी समितीचे सर्व सदस्य, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, चंद्रकांत कुऱ्हाडे, सचिन रानवडे, तान्हाजी कुऱ्हाडे, पांडुरंग वरखडे, योगेश कुऱ्हाडे, चिंतामणी कुऱ्हाडे, सिध्देश कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, महेश कुऱ्हाडे, गणेश कुऱ्हाडे, तसेच आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

          सहादू बाबूराव कुऱ्हाडे अनेक वर्षे पालखी सोहळ्यात बैलजोडीची सेवा करत असून यावेळी स्वतःची बैलजोडी रथाला जुपण्याची सेवा मिळाली हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंद सोहळा आहे असे बैलजोडीचे मानकरी सहादू बाबूराव कुऱ्हाडे वस्ताद यांनी यावेळी सांगितले. बैलजोडीचा मान मिळाल्याने कुऱ्हाडे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.