मोचर्डा येथे श्री. संत अच्युत महाराज यांचा जन्म शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा…

युवराज डोंगरे/खल्लार

           उपसंपादक

येथुन जवळच असलेल्या मोचर्डा येथे ५४ वर्षा पासुन चालू असलेले तीन दिवसीय गुरु चरित्र व गुरु महिमा प्रवचन दि.८ ते १० मे पर्यंत श्री संत सचिन देव महाराज यांच्या वाणीतून संपन्न झाले.

            या प्रवचनात मोचर्डा गावामध्ये पंचक्रोशीतील सर्व भक्त मंडळींनी हजेरी लावली त्यामुळे गावातील वातावरण भक्तिमय झाले होते.कार्यक्रमाची सांगता गुरू पूजा व ग्रंथ पूजा करुन पार पडली श्री संत अच्युत महाराज यांचे परम शिष्य श्री संत सचिन देव महाराज यांना संत उपाधी प्राप्त झाली त्या निमित्त महाराजांचा फेटा प्रदान करून शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

         त्यावेळी श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती व श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळ शेंदुरजना बाजार चे अध्यक्ष अनिल सावरकर, दर्यापूर , बाभळी सत्संग मंडळ चे अध्यक्ष किरण मोकासदर तसेच शेंदुरजना बाजार सत्संग मंडळ, बेलोरा, नालवाडा, चिपर्डा, चांदई तसेच संपूर्ण पंचक्रोशीतील भक्त मंडळी उपस्थित होती.

            सुनील भि. गावंडे यांनी तीनही दिवस अतिशय चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केले श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळ मोचर्डा यांनी सर्व भक्त मंडळींचे आभार व्यक्त केले.