नवजीवन सीबीएसई मध्ये रविंद्रनाथ टागोर यांची जंयती साजरी…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

साकोली – नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल सीबीएसई साकोली येथे गुरूदेव रविंद्रनाथ टागोर जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुजा करण्यात आली.

         यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना प्राचार्य मुजम्मिल सय्यद यांनी रविंदनाथ टागोर यांच्या विषयी माहितीत सांगीतले की, ते एक महान कवि, देशभक्त, कादंबरीकार, संगीतकार, मानवतावादी व चित्रकार होते. तसेच ते भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेते होते. जन गण मन व आमार शोनार बांग्ला हे भारत व बांग्लादेश यांच्या राष्ट्रगीताचे जनकत्व असलेले गुरूदेव हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत.

          कार्यक्रमाचे संचालन अस्मिता मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन सरताज साखरे यांनी मानले. या कार्यक्रमाकरीता शाळेतील शिक्षकगण व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.