मांजरी म्हसला केंद्रामध्ये निपूनोत्सव साजरा…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिमटाळा येथे मांजरी म्हसला केंद्राची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.

         त्या शिक्षण परीषदेच्या अध्यक्ष स्थानी शारदाताई मेंढे अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती टिमटाळा ह्या होत्या तर, प्रमुख पाहुणे म्हणून सरीताताई मेंढे, श्रीराम सहारे सा.कार्यकर्ते, अनिकेत कराळे, विशाल गावंडे सा.कार्यकर्ते, सुरज सहारे व कोटांगळे ताई उपस्थित होत्या. 

         प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. कल्पना वानखेडे केंद्रप्रमुख तथा अधीक्षक शालेय पोषण आहार नांदगाव, सुरज मंडे मुख्याध्यापक मंचकावर उपस्थित होते. 

             शिक्षण परिषदमधे ज्या शाळेचे इयत्ता पहिली व दुसरी चे विद्यार्थ्याचे 23/24 सत्राचे शेवटी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे आढळले अश्या शाळामधील शिक्षकांचे केंद्रप्रमुख कल्पना वानखेडे यांनी पुष्प देवून स्वागत केले.

         या कार्यक्रमामधे सुनिता लोणकर मॅडम सेवानिवित्त होत असल्याबद्दल त्यांनी सन्मानित करण्यात आले. त्या मागील सत्रातील जुलै 23 पासून त्या टीमटाळा येथे बदलीने रुजू झाल्या होत्या.अगदी अल्प कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांना पालकांना व गावकऱ्यांना आपलेसे केले, अश्या प्रतिक्रिया कार्यक्रमामध्ये दिसून आल्या.

            सुनिता लोणकर मॅडम सेवानिवृत्त होत असल्याबद्दल त्यांना आपुलकीने भेटवस्तू देण्यात आल्या व पुढील आयुस्याकरिता शुभेछ्या देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिता लोणकर यांनी पार पाडले.         

               संचमान्यता नवीन शासन निर्णय व ड्रेसकोड या बाबत शासनाचे पत्रकची सुरज मंडे यांनी परिषदेमध्ये माहिती दिली. यथोचित पाहुण्यांनी परिषदेमध्ये मार्गदर्शन केले. या परिषदेमध्ये पुरणपोळीचा स्नेहभोज शाळेच्या वतीने देण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता झाली. शिक्षण परिषद करिता केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.