महाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीरात १०५ रक्तदात्यांचा सहभाग…

दिनेश कुऱ्हाडे

    उपसंपादक

आळंदी : येथील डुडुळगावात १ मे कामगार, महाराष्ट्र दिन आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तळेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत तसेच अनावश्यक खर्च टाळून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात आयोजित करण्यात आले.

             या शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच आरोग्य तपासणी शिबिरात १५० वर नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

           या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्यास एक टी शर्ट, प्रमाणपत्र आणि एक तुळशी वृंदावन भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

           गेल्या ४ वर्षां पासून सामाजिक बांधिलकीतून आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येत आहे. सुमारे १०५ रक्तदात्याने यामध्ये सहभाग घेतला. १५० हून अधिक लोकांनी आपले मेडिकल चेकअप करून घेतले. महिला नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.

          रक्तदान आणि मेडिकल चेकअप शिबिराचे नियोजन टाटा मोटर्स कार प्लांट युनिट अध्यक्ष योगेश तळेकर, प्रदीप तळेकर मित्र परिवार, महिंद्रा अँड महिंद्रा मित्र परिवार, टाटा मोटर्स मित्र परिवार, डुडूळगावमधील सर्व सोसायटी मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ डूडुळगाव यांच्या वतीने श्री संत सावतामाळी मंदिर डुडूळगाव येथे करण्यात आले.  

       पिंपरी चिंचवड ब्लडबँक आणि कमलेश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डुडूळगाव यांच्या विशेष सहकार्याने शिबीर यशस्वी झाले.

         यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, गणेश सस्ते, पुणे युवासेना जिल्हा प्रमुख धनंजय पठारे, आळंदी शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, साईनाथ ताम्हाणे, रमेश वहिले, बजरंग वहिले, दामोदर वहिले, सचिन तळेकर, शंकर वहिले, संदिप तळेकर, सागर तळेकर, अमोल धायरकर, उमेश तळेकर, पंडित तळेकर, सचिन पवार, कैलास वहिले, विक्रम वहिले, सचिन वहिले, सागर तापकीर, सागर वहिले, विजय चव्हाण, विजय पोफळकर आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदात्यांचे आभार मनात सत्कार करण्यात आला.