वडधा येथील किसान विद्यालयाचे सुयश… — शिष्यवृत्ती परीक्षेत ठरले पात्र….

अश्विन बोदेले 

जिल्हा प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत

        आरमोरी:- तालुक्यातील वडधा येथील स्थानिक किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथील पूर्व माध्यमिक 8 वि च्या शिष्यवृत्ती परीक्षेत 64 विद्यार्थ्यांपैकी 37 विद्यार्थी पास झालेले आहेत. आणि पूर्व उच्च प्राथमिक 5 वि च्या शिष्यवृत्ती परीक्षेत 44 विद्यार्थ्यांपैकी पैकी 20 विद्यार्थी पास झालेले आहेत. 

         शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथील मुख्याध्यापक भोयर सर, पर्यवेक्षक नैताम सर तसेच सर्व शिक्षकांनी व कर्मचारी वृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.