Home शैक्षणिक कढोलीत MS-CIT विद्यार्थ्यांची डिजिटल प्रेझेंटेशनमध्ये चमकदार कामगिरी…

कढोलीत MS-CIT विद्यार्थ्यांची डिजिटल प्रेझेंटेशनमध्ये चमकदार कामगिरी…

     राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

        कढोली येथील एंडव्हान्स कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या MS-CIT सेंटरमध्ये विद्यार्थ्यांनी डिजिटल प्रेझेंटेशन सादरीकरणात उत्कृष्ट कामगिरी करत उपस्थितांची मने जिंकली. विविध विषयांवर आकर्षक सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले.

         या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आधुनिक स्लाईड डिझाईन, अ‍ॅनिमेशन, ट्रान्झिशन आणि प्रभावी संवाद कौशल्याचा उत्तम वापर केला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक विषय मांडत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. गुणवत्तेनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

         संस्थेच्या मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली असून शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात त्यांना प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

          कार्यक्रमात नंदीनी लांजेवार, सागर खंडारे, सानिया सहारे, आयुष जांम्भुलकर यांसह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन निगम कोटांगले यानी एंडव्हान्स कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, जांभळी रोड, कळोली येथे करण्यात आले.

        संचालक लोमेश कोटांगले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.