राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था, कुरखेडा द्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत भरघोस यश संपादन करत 100 टक्के निकाल लावण्याची गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे.
श्रीराम विद्यालयातील कुमारी तनुष्का तुळशीराम गजभिये हिने 92% गुण प्राप्त करून विशेष यश मिळविले असून कुमार भाविक विलास हुंडरा याने 80% गुण संपादन केले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शाळेमध्ये सत्कार करून अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष वामनरावजी फाये, संस्था सचिव दोषहर फाये, श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य नागेश्वर फाये, संस्कार पब्लिक स्कूलचे प्राचार्य देवेंद्र फाये, नानाजी खुणे, नरहरी माकडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



