Home शैक्षणिक दंडकाऱ्यांनी शिक्षण संस्थेच्या शाळांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…  

दंडकाऱ्यांनी शिक्षण संस्थेच्या शाळांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…  

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी

गडचिरोली :- दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित घटक संस्थेतील सर्व शाळांनी आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक प्राविण्याची वाटचाल करीत आहे.         

         दंडकारण्य संस्था ही अतिशय उत्कृष्ट ,नवनवीन प्रयोग राबविणारी, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विविध शैक्षणिक उपक्रमांची आखणी करणारे ,शैक्षणिक दृष्ट्या उपक्रमशील अशी ओळख केवळ गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर पूर्व विदर्भात आहे. या संस्थेची स्थापना स्वर्गीय गो.ना. मुनघाटे साहेबांनी 1972 मध्ये केलेली केलेली होती .त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत विद्यमान उपक्रमशील अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे आपल्या घटक संस्थेत विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असतात.

         दंडकाऱ्यांणय घटक संस्थेअंतर्गत येणाऱ्या प्रज्ञा संस्था कॉन्व्हेंट 100%, विद्याभारती हायस्कूल आंबेशिवनी चा निकाल 90.90% , विद्याभारती कन्या हायस्कूल 90%, विद्याभारती हायस्कूल गोगाव 85.71% ,विद्याभारती हायस्कूल पुराडा 75.60%चा , अनुदानित आश्रम शाळा मुरमाडी 78.57% ,आश्रम शाळा चांदाळा 62.50%,कमलताई मुनघाटे हायस्कूल गडचिरोली चा निकाल 60.65% निकाल लागलेला असून दंडकारण्यसंस्थेने आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवलेला आहे.  

              दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास सन्शोधन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचे तसेच सर्व कार्यकारिणी यांचे यथोचित मार्गदर्शन ,सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन, शाळेत होणारे नियमित वर्ग, नियमित चाचण्या ,डिजिटल वर्ग खोल्या,अद्यावत प्रयोगशाळा, शाळेत मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा, समृद्ध ग्रंथालय ,ग्रंथालयात असणारे विविध पुस्तके व संदर्भ ग्रंथे, अनुभवी व उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद, यामुळेच हे यश प्राप्त करता आले असे विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले .

       सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय दंडकारण्य संस्थेच अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे , प्राचार्या डॉ. वंदनाताई मुनघाटे, प्राचार्य स्मिताताई लडके ,प्राचार्य खरवडे, प्राचार्य पठाण मॅडम, प्राचार्य पिल्लेवान, मुख्याध्यापक चुधरी सर, मुख्याध्यापिका चिलबुले मॅडम, मुख्याध्यापिका उसेंडी मॅडम व वर्गशिक्षक यांना दिलेले आहे.

          सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे ,उपाध्यक्ष देवाजी पाटील नरुले,सचिव प्रोफेसर डॉ .प्रमोदभाऊ मुनघाटे, अनिल पाटील मुनघाटे, पांडुरंग पाटील मशाखेत्री ,सुग्रीव दूधमोचन ,डॉ. सुरेशजी लडके साहेब, नामदेवजी बाणबले ,सौरभदादा मुनघाटे, सर्व सन्माननीय कार्यकारणी मंडळ, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेले आहे.