Home Maharashtra शेतीची मशागत करायची कशी? शेतकरी चिंताग्रस्त,”सरकारकडे लक्ष!

शेतीची मशागत करायची कशी? शेतकरी चिंताग्रस्त,”सरकारकडे लक्ष!

 लक्षवेधी

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका

      ढगाळलेल्या आभाळाकडे बघत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त होतांना दिसत आहेत.त्यांना समस्याच्या अनेक ओझात प्रश्न पडलेला आहे की,शेतीची मशागत करायची कशी?

          महाराष्ट्र सरकारने ३० जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली असली तरी,अटी अंतर्गत कर्जमाफी गुंतागुंतीची केली असल्याने राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी कशाप्रकारे करणार? कर्जमाफीचे शेतकऱ्यांना तोटे होणार की फायदे? त्यांच्या शेतीच्या मशागतीसाठी रुपयांची मदत सरकार वेळेवर करणार काय? स्थानीक सोसायटी व बॅंका वेळेत तारण कर्ज देणार काय? या प्रश्नांनी शेतकरी मनस्वी घायाळ झाले आहेत.

          शेतकरी कौटुंबिक समस्यांसह इतर समस्यांच्या ओझात दबून असल्याने,अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागतो आहे.यामुळे शेतीची मशागत करायची कशी? हा प्रश्न त्यांच्यापुढे अधिकच जाटील बनलेला आहे.

              शेतकऱ्यांची कर्जमाफी हे कोड्यातील संकट असल्याने ते सरकारच्या कर्जमाफीकडे लक्ष ठेवून आहेत.तद्वतच सन २५-२६ च्या हंगामात अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक संकटानी शेतकऱ्यांना झोडपून काढल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादन क्षमतेत प्रचंड प्रमाणात घट झाली.

         यामुळे परत शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत.चौहू बाजूंनी कोंडींत अडकलेले शेतकरी,आर्थिक संकटातून सध्यातरी बाहेर पडणार नाही अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

             तद्वतच जून महिन्यात शेतीच्या हंगामाला सुरुवात होत असल्याने महाराष्ट्र सरकारकडून में महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकार कडून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे अपेक्षित आहे. 

       शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षात दबणार नाही आणि आर्थिक संकटात सापडणार नाही,अशीच शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी असल्याचे शेतकऱ्यांचेच म्हणणे आहे..

      महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतांना सर्व अटी व नियम स्थितील करावेत,”हिच शेतकऱ्यांची आर्त हाक!..