Home Maharashtra दिड लाख रुपयांचा प्रवास आणि चर्चेला भलतेच उधाण! — वाळू…वाळू…वाळू…

दिड लाख रुपयांचा प्रवास आणि चर्चेला भलतेच उधाण! — वाळू…वाळू…वाळू…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

        महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.यातच वाळू सारख्या गौण खनिजांचे अवैध उत्खनन जोमाने सुरु आहे.

         वाळूचे अवैध उत्खनन सुरु ठेवण्यासाठी व वाळू माफियांना सातत्याने संरक्षण देण्यासाठी,” काल दिनांक ०८/०५/२०२६,रोज शुक्रवार ला दिड लाख रुपयांचा प्रवास झाल्याची खमंग चर्चा चिमूर तालुक्यात सुरु आहे.

            चिमूर तालुकातंर्गत भिसी अप्पर तालुका परिसरातील वाळू माफीयांकडून दिड लाख रुपयांचे एका व्यक्तीच्या बॅंक अकाऊंटवर काल ट्रान्जेक्शन करण्यात आल्याच्या चर्चेने रान माजवले असून रुपये ट्रान्जेक्शन करणारे वाळू माफिये कोण आणि रुपये घेणारा तो अधिकाऱ्यांचा हस्तक दलाल कोण?,हा प्रश्न वाळू माफियांची सखोल रुजलेली साखळी उजागर करतो आहे.

       वाळूचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु राहावे यासाठी दोन नावाची चर्चा असली तरी यात अनेक धुरंधर मासे अवैध वाळू उत्खननात समाविष्ट आहेत हे स्पष्ट आहे.

        रुपये गोळा करणारा हा भिसी येथील वाळू माफीयाचा दिवाणजी असल्याचे बोलले जात आहे,तर रुपये घेणारा बडा अधिकारी असल्याचे चर्चेतून दिसून आले आहे.

          काल झालेली दिड लाख रुपयांची जमा हप्तेखोरी चर्चेचा विषय बनला असली तरी,गुपचूप होणारी हप्तेखोरी किती लाख रुपयांची असेल,याचा अंदाज वर्तविणे शक्य नाही.

         चिमूर तालुकातंर्गत अवैध वाळू व्येवसायाद्वारे होणारी दरमहा देवाणघेवाण २० लाख रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.यामुळे अवैध वाळू चोरीच्या हप्तेखोरीत कुणाकुणाचा सहभाग आहे,हे गुलदस्त्यातील कोडे आहे.