एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्सच्या प्राचार्य पदी लिझेश रामाकृष्णन रुजु…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

 दर्यापूर येथील एकमात्र सी बी एस ई मान्यता प्राप्त असलेल्या एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्सच्या प्राचार्य पदी लिझेस रामकृष्णन यांची निवड करण्यात आली.

           लिझेश सर हे सी बी एस ई शिक्षण क्षेत्रातील अनुभव संपन्न असलेल्यांपैकी एक आहेत.  केरळ वरून दर्यापूर येथील एकविरा शाळेमध्ये रुजू झाले. त्यांना विविध राज्यातील सीबीएसई शाळेचा दांडगा अनुभव आहे तो अनुभव आपल्या दर्यापूर शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल या दृष्टीने शाळेच्या विश्वस्त मंडळांनी विशेष प्रयत्न करत त्यांना एकविरा शाळेची धुरा खाद्यवर दिली आहे.

            शिक्षणाबरोबरच विद्यार्थी हितार्थ नवनवीन अध्यापन प्रणालीचा वापर ते करीत आहेत विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानापुरतेच मर्यादित न ठेवता त्या पलीकडील ज्ञान ते देत आले आहे.

           विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास कसा होईल याविषयी आगामी काळात भर देणार असल्याचे त्यांनी व्यक्त केले शिक्षकांना सुद्धा विविध विषयाचे ज्ञान देण्याचे कार्य त्यांनी सुरू केले.

            त्याच्या रुजू होण्याने शाळा ही उत्तम दर्जाचं शिक्षण देणार यात शंका नाही तर दृकश्राव्य साधनांचा वापर करून प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थी व शिक्षकांना देण्यावर त्यांचा अधिक भर आहे.

         शिक्षण क्रीडा, संगीत,क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांना एक नवसंजीवनी मिळत असल्याने पालकांनी समाधान मानले. एकविरा शाळेत त्यांचा पारंपारिक पद्धतीने स्वागत समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद शालेय विश्वस्त मंडळ उपस्थित होते.