अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा नांदगाव खंडेश्वरचे तालुका स्तरीय अधिवेशन शुक्रवार दि.०३ मे ला…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

          अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ नांदगाव खंडेश्वरचे तालुकास्तरीय अधिवेश दि ३ मे रोजी २०२४ ला शिवदत्त हनुमान मंदिर सभागृह, श्रध्दा कॉलनी, साई नगर, अमरावती येथे साजरे होणार आहे.

         ‘जागतिक शिक्षक महासंघाशी’ संलग्न असणारी ‘अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ’ संपूर्ण भारतातील प्राथमिक शिक्षकांची एकमेव संघटना आहे .

            तालुका स्तरापासुन ते राष्ट्रीय स्तरापर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविणारी व शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी सदैव लढा देणारी,तद्वतच शिक्षकांना प्रशिक्षित करून त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण रूजवून,प्रगत शैक्षणिक राष्ट्र निर्माण करण्याकरीता सदैव अग्रेसर असणारी संघटना म्हणून नावलौकीक प्राप्त अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आहे.या

       संघटनेचे नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अधिवेशन व नविन कार्यकारिणी निवड शुक्रवार दि. ३ मे २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वा. आयोजित केलेली आहे. या प्रसंगी नांदगाव पं.स. अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात येईल.

       या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गजानन चौधरी जिल्हा अध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ हे राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून किरण पाटील नेते असणार आहेत,मुख्य मार्गदर्शक म्हणून राज्य उपाध्यक्ष हे लाभणार आहे. तर विशेष उपस्थिती संजय झंझाळ गटविकास अधिकारी प.स. नांदगाव,प्रमिलाताई शेंडे गटशिक्षणाधिकारी पं. स.नांदगाव, कल्पना वानखडे अधिक्षक, शालेय पोषण आहार तथा केंद्र प्रमुख मांजरी म्हसला, जनुना, सुभाष सहारे सरचिटणीस, मनोज चोरपगार संजय नागे, संजय साखरे कार्याध्यक्ष,अशोक चव्हाण कोषाध्यक्ष, बाबारावजी गुंड राजेंद्र पोकळे, पंजाबराव जोगे, माधुरी देशपांडे ह्या राहणार आहे.

            प्रमुख उपस्थितीत म्हणून संगीताताई देव उप सरचिटणीस, सुनिताताई पाटील महिला आघाडी प्रमुख, वृषाली देशमुख समन्वयक, महिला आघाडी, अमरावती,निळकंठराव यावले,पंडितराव देशमुख, राजाभाऊ होले, सतिश गुजरकर, प्रितम चर्जन अधिक्षक, शिक्षण तथा सा.प्र.वि., पं.स.नांद. खंडे विलास राठोड केंद्र प्रमुख, धानोरा गुरव, प्रविण मेहरे केंद्र प्रमुख, लोणी, दिपक कोष्टी केंद्र प्रमुख, सुलतानपूर, जफर अली केंद्र प्रमुख, नांदगाव खंडेश्वर, बलदेव घुगे केंद्र प्रमुख, लोहगांव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

       या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत राहायचे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे. असे प्रसिद्धी प्रमुख सुरज मंडे यांनी कळविले आहे.