पुर्व विदर्भातील मतदार…

प्रदीप रामटेके 

    मुख्य संपादक

         अठराव्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले.यात महाराष्ट्र राज्यातंर्गत पुर्व विदर्भातील ५ लोकसभा क्षेत्राचा समावेश आहे….

           ५४३ लोकसभा सदस्यांची निवडणूक ७ टप्प्यात होणार असून १ जून पर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे.अठराव्या लोकसभा निवडणुकीतंर्गत विविध पक्षांच्या प्रचार यंत्रणात जुन्या प्रचारासारखा प्रभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवले नाही.

           याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची हवा मतदारांनी आधिच काढून टाकली आहे.यामुळे भाजपाचे कितीही मोठे नेते प्रचार मैदानात उतरले तरी त्यांचे मार्गदर्शन ऐकायला कुणी जात नाही तर त्यांना बघायला जात असल्याचे वास्तव समोर आले.

          पुर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर,भंडारा,रामटेक,नागपूर,लोकसभा मतदारसंघाची आज निवडणूक पार पडली.यात रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

       भाजपाने स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, पाचही लोकसभा मतदारसंघात दम लावलाय.पण,त्यांच्या दमात विश्वास असल्याचे जाणत नव्हते.

         तद्वतच अठराव्या लोकसभा निवडणुकी अंतर्गत मतदारांचा पक्षकल जाणून घेतला असता,त्यांनी भाजपाच्या सत्तेला अयोग्य म्हटले व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

           मतदार एवढे सतर्क झाले आहेत की ते कुणाला मत देणार हे सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते.मात्र एवढे निश्चित बोलून जायचे की,अनुसूचित जातींचे मत काॅंग्रेसकडे वळले तर विदर्भात काॅग्रेस बाजी मारेल.

          पुर्व विदर्भातील मतदार कांग्रेसच्या जवळ गेल्याचे दिसून आले.एरवी भाजपाच्या मतदारांनी सुध्दा काँग्रेसला जवळ केले असल्याचे पुढे आले.

            अठराव्या लोकसभा निवडणुकीत पुर्व विदर्भातील मतदार चाणक्य झाला असल्याचे ४ जूनलाच कळेल.