राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी…

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

कन्हान : – नगरपरिषद कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती विनम्र अ़भिवादन करून ग्राम जयंती म्हणुन साजरी करण्यात आली. 

       मंगळवार (दि.३०) एप्रिल २०२४ ला नगरपरिषद कन्हान-पिपरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ११५ व्या जयंती निमित्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजां च्या प्रतिमेला नगरसेवक विनय यादव व नगरपरिषद विभाग प्रमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण आणि विनम्र अभिवादन करून ग्राम जयंती म्हणुन साजरी करण्यात आली. 

         कार्यक्रमास आस्थापना विभाग प्रमुख प्रांजली सांभारे, स्वच्छता विभाग प्रमुख फिरोज बिसेन, प्रिया सिरसाट, रविंद्र धोटे, अभिलाष हिवसे, देवीलाल ठाकुर, निरंजन बड़ेल, रवि पाहुणे, शुभम काळबांडे, शुभम येलमुले, महेश बढेल, शुभम यादव, अमोल बंसरे, निहाल बढेल, राष्ट्रपाल नारनवरे, बंटी खिचर, मनिषा लहोरिया, मीना खंडारे आदि विभाग प्रमु़ख व कर्मचा-यांनी प्रामुख्याने उपस्थित राहुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी केली.