ब्रेकिंग न्यूज… — झाडावर विद्यूत वाहीणीचा धक्का बसल्याने इसमाचा मृत्यु… — आंधळी फाट्याजवळील घटणा…

     राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधि 

         आंवान हायस्कूल आंधळी फाट्याजवळ शेळ्यांचा चारा करीता डाळा तोडण्याचा निमीत्याने झाडावर चढलेल्या इसमाला झाडाचा फांद्याला स्पर्श करीत गेलेल्या विद्यूत वाहीनीचा धक्का बसल्याने तो झाडावरून खाली पडत मृत्यु झाल्याची घटणा आज दि. ३० एप्रील मंगळवार रोजी सकाळी १०.३० वाजेचा सूमारास घडली.

            तालूक्यातील वाघेडा येथील मृतक तुलाराम मुखरू राऊत वय ४४ हा काही कामानिमीत्य कूरखेडा-देसाईगंज मार्गालगत असलेल्या आंधळी फाटा येथे आला होता यावेळी रस्ता लगत असलेल्या उमरीचा झाडावर शेळ्यांचा चारा करीता डाळा तोडण्यास तो चढला होता मात्र येथे त्याला जोरदार विजेचा धक्का बसल्याने खाली कोसळत जागीच त्याचा मृत्यु झाला.

           या झाडाचा वरून ११ केव्ही विद्यूत वाहीनीचे तार गेलेले आहेत व तारांचा स्पर्श हा झाडाचा फांद्याला होत आहे त्यामूळे झाडाला करंट येत त्या धक्क्यानेच त्याचा मृत्यु झाला असावा असा अंदाज आहे मृतक हा आचारीचे काम करीत होता त्याचा मागे वृद्ध आई-वडील,पत्नी तसेच ४ अविवाहित मूली आहेत.