उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
वादळीवाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरु असताना गुऱ्हे बांधण्यासाठी (पाळीव प्राणी) गोठ्याकडे वळण घेताच शेतकऱ्यावर विज कोसळल्याने ते जागीच गतप्राण झाले असल्याची धक्कादायक तथा दुर्दैवी घटना आज ४ वाजताच्या दरम्यान घडली…
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा खापरी (डोमा) येथील रहिवासी श्री.रणभीड रामजी रामटेके वय ५० वर्ष यांचा विजेच्या प्रवाहाने आज करुन अंत झाला.
वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत असल्याने श्री.रणभीड रामजी रामटेके हे स्वत:चे पाळीव जनावरे गोठ्यात बांधण्यासाठी जात असताना त्यांच्यावर विज कोसळली.
मौजा खापरी येथे शोककळा पसरली असून रामटेके परिवार शोकाकुल झाला आहे.सदर घटना महाराष्ट्र राज्यातील आहे.



