शिराळा येथे रविवार दिनांक 21 रोजी 3 वाजता निकाली कुस्त्याचे जंगी मैदान, तर हजारो नामांकित पैलवानांची उपस्थिती… — शंभु महादेव यात्रा उत्सवानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान शंभु महादेवाच्या प्रांगणात रंगणार कुस्ती आखाडा…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

            शिराळा तालुका परांडा येथे निकाली कुस्त्याचे जेंगी मैदान रविवार दिनांक 21 रोजी दुपारी 4 वाजता भरविण्यात येणार.तर राज्य व राज्याबाहेरून आनेक कुस्ती मल्ल पैलवान व प्रेक्षक यांची 5 हजाराहून अधिक संख्येने उपस्थित राहणार. 100 रुपये पासून ते 100000(एक लाख ) रुपये इनामा पर्यंतच्या निकाली कुस्त्या लावण्यात येणार आहेत. 

             संयोजक,शंभू महादेव यात्रा कमिटी शिराळा, ग्रामपंचायत शिराळा, सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावचे पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, आणि सर्व ग्रामस्थ व भाविक भक्त या सर्वांच्या प्रयत्नाने शिराळा येथील शिवशंभु महादेव यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

            शिराळा गावच्या वतीने कुस्ती आखाड्याची जय्यत तयारी केलेली असून सर्व आलेले कुस्ती मल्ल पैहलवान यांना पिण्यासाठी पाणी अत्यंत उत्तम सोय कुस्ती आखाड्याच्या आजूबाजूचा सर्व परिसर स्वच्छता करण्यात आलेला आहे.

             कुस्ती आखाड्याला भेट देण्यासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान व अनेक मान्यवरांची उपस्थिती होणारच रविवार दिनांक 21/ 4 /2024 दुपारी 4 वाजता कुस्ती आखाडा भरविण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र राज्य व राज्या बाहेरूनही कुस्ती मल्ल पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तसेच सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, नगर,आशा आनेक जिल्ह्यातू नामांकित कुस्तीमल्ल पैलवानांची हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार, शिराळा येथील कुस्ती उत्सव कमिटीच्या वतीने यावेळी मीडियाशी बोलताना सांगण्यात आले. तसेच या ठिकाणी नामांकित पहिलवानांचा व मान्यवरांचा विशेष सन्मान व सत्कारही फेटा बांधून करण्यात येणार आहेत.

            शिराळा येथील निकाली कुस्त्याच्या निवेदना साठी, संपूर्ण राज्यामध्ये ओळख निर्माण झालेले पैलवान दिनेश गवळी बारशी यांची या कुस्ती आखाड्यासाठी प्रमुख निवेदक म्हणून उपस्थित आहे.

चौकट 

या कुस्ती आखाड्यामध्ये नामांकित 3 मोठ्या कुस्त्या लावण्यात येणार आहेत पैहलवान हे प्रेक्षकांची मने जिंकणार.